postpartum depression

. घरातील काही गोष्टींमुळेसुद्धा तुमचे मानसिक आरोग्य(Mental Health) बिघडू शकते असे तज्ञांनी म्हटले आहे. तसेच घरातील ज्या वातावरणात तुम्ही राहता त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या आरोग्यावर पडत असतो.

  सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दिवसागणिक व्यक्तींना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. घरातील काही गोष्टींमुळेसुद्धा तुमचे मानसिक आरोग्य(Mental Health) बिघडू शकते असे तज्ञांनी म्हटले आहे. तसेच घरातील ज्या वातावरणात तुम्ही राहता त्याचा सुद्धा परिणाम तुमच्या आरोग्यावर पडत असतो.

  घराच्या एकूणच प्रतिकृतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही राहत असलेल्या घरातील वातावरण, हवा आणि उजेड आणि घरातील वस्तू नीटनेटक्या ठेवल्या नसतील तर तुमची वारंवार चिडचिड होऊ शकते. ही गोष्ट जर तुमच्यासोबत वारंवार होत असल्यास त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.  घरातील कोणत्या गोष्टी मानसिक आरोग्यावर परिणाम करु शकतात हे जाणून घ्या.

  घरात असलेला पसारा- जर तुमच्या घरात पसारा असेल तर तुम्हाला उत्साही कधीच वाटणार नाही. याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर पडू शकतो. एका रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, ज्या महिलांच्या घरात सर्वत्र पसारा असतो त्यांच्यामध्ये तणाव हार्मोन्स, कोर्टिसोलचा स्तर वाढला जातो. त्यामुळे तुम्हाला अधिक राग येऊ शकतो.

  घराची प्रतिकृती- घराची एकूणच प्रतिकृतीसुद्धा तुमच्या मानसिक आरोग्य बिघडण्याचे एक कारण ठरु शकते. तुम्ही जर एका लहान घरात राहत असाल आणि तेथे खेळती हवा सुद्धा येत नसेल तर तुम्हाला तेथे राहणे नकोसे होईल. अशा लोकांमध्ये ताण आणि झोप पूर्ण न होण्याची समस्या उद्भवू शकते.

  घरातील वस्तू नीट न ठेवणे – जर तुमच्या घरात सर्व वस्तू नीटनेटक्या पद्धतीने ठेवल्या नसतील तर तुम्हाला ते बघवणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होण्यास कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.

  घरात होणारा आवाज – तुमच्या घरात वारंवार भांडण होणे, मोठ्या आवाजात टिव्ही पाहणे, मोठमोठ्याने ओरडणे याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर पडू शकतो. यामुळे घरातील वातावरण बिघडण्याससुद्धा मदत होते.

  या व्यतिरिक्त तुमच्या घरात पुरेसा उजेड किंवा खेळती हवा नसेल तर तुमची चिडचिड होणे साहजिकच आहे. त्याचसोबत घराच्या भिंतींना फिके रंग असल्यास तुम्हाला उत्साही सुद्धा वाटणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधारा.