बाप बनण्याचं असतं हेच योग्य वय; अनेक पुरुषांना नाही माहिती

आतापर्यंत आपल्याला माहीतच आहे की, स्त्रियांना आई होण्यासाठी ठराविक वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादे पर्यंतच ती आई होऊ शकते असे मानले जाते, पण स्त्री बरोबरच पुरुषांमध्ये देखील समस्या असू शकतात. तेही बाबा होण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी कमी पडू शकतात.

  आई-बाबा होणे हे प्रत्येकाचं स्त्री पुरुषाचं स्वप्न असते. बाळ  जन्माला घालण्याच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला जेवढे महत्त्व दिले जाते. तितकेच महत्त्व पुरुषालाही आहे. पण आईबाबा होण्यासाठी दोघांचीही संमती असणे खूप महत्त्वाचे असते. तसेच शारीरिक व मानसिक तयारी ही लागते. पण आई-बाबा होण्याची योग्य वेळ कोणती याचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  आतापर्यंत आपल्याला माहीतच आहे की, स्त्रियांना आई होण्यासाठी ठराविक वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादे पर्यंतच ती आई होऊ शकते असे मानले जाते. एखादी स्त्री आई होत नसेल किंवा आई होण्यास सतत अपयश येत असेल, तर तिला दोषी ठरवले जाते. तिच्यावर अनेक उपचार केले जातात. अशा अनेक घटना आपण समाजामध्ये पाहतच असतो.

  पण स्त्री बरोबरच पुरुषांमध्ये देखील समस्या असू शकतात. तेही बाबा होण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी कमी पडू शकतात. अशावेळी त्यांचीसुद्धा प्रजनन क्षमता कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी त्या जोडप्याने दोघांचीही योग्य तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे स्त्रीचे आई बनण्याचे योग्य वय असते.

  त्याप्रमाणेच पुरुषाचे देखील बाबा होण्याचे एक योग्य वय असते. विशेष म्हणजे समाजामध्ये याबद्दल खूप अज्ञानता आहे. वयोमर्यादेनंतर पुरुषांनी बाबा होण्याचा विचार केल्यास ते असक्षम ठरू शकतात. त्यांना सतत अपयश मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अपत्य प्राप्तीसाठी पुरूषांनी नेमके कधी प्रयत्न करावेत याबाबत डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे महत्त्वाचे असते.

  पुरुषांनी वयाची तिशी उलटली की, त्यांच्यामधील टेस्‍टोस्‍टेरोनचा स्तर एक टक्क्याने कमी होत जातो. जो पुरुषांमध्ये फर्टिलिटी निर्माण करण्याचा महत्त्वाचा घटक असतो. या हार्मोन मधील कमतरता पुरुषांच्या स्पर्मकाऊंटवर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे जसजसाठी वय वाढले तसतसे बाबा बनण्याची शक्यता कमी होत जाते.

  म्हणूनच पुरुषांनी योग्य त्या वयात बाबा होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्यांना प्रजनन समतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.

  जीवनशैलीशी निगडित असलेल्या आपल्या अनेक सवयी अर्थातच धुम्रपान, मद्यपान करणे. तसेच घट्ट अंडर वियर परिधान करणे. या गोष्टींचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जे पुरुष बाबा बनू इच्छितात ते आपल्या शुक्राणूंचा दर्जा वाढविण्यासाठी, आपल्या आहारामध्ये व जीवन शैलीमध्येबदल करू शकतात.