पावसाळ्यात अशा प्रकारे टाळा अतिसार

अतिसार टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असते.

  पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यातच अतिसाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळतात. अतिसार ( diarrhea) टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असते.

  – आवर्जून स्वच्छता पाळावी.
  – नागरिकांनी पाणी साठविण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.
  – पाणी साठविताना ते गाळून प्यावे.
  – पिण्याचे पाणी उकळवून,
  – थंड करून प्यावे.
  – पाणी नेहमी झाकून आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावे.
  – नेहमी गरम व ताजे अन्न खावे, उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळावेत.
  – अन्न झाकून ठेवावे.
  – शौचावरून आल्यावर, जेवण बनविण्याआधी, जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
  – जुलाब सुरू झाल्यास भरपूर पाणी प्यावे.
  – जलसंजीवनी (ओआरएस-ORS) चे द्रावण सुरू करावे.
  – स्तनपान करणाऱ्या बालकांचे स्तनपान सुरू ठेवावे.