लस घेतल्यावर हे नक्की करा, साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवले हे उपाय, चहा प्या, दाणे खा आणि….

कोरोनावरील लस घेतल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळे साईड इफेक्ट जाणवतात. काहीजणांना सौम्य ताप येतो, तर काहींंना अशक्तपणा जाणवतो तर काहींना अंगदुखी सुरू होते. काहीजणांना दंडात ज्या ठिकाणी लस टोचली जाते, त्या ठिकाणी वेदना व्हायला सुरुवात होते. एक ते दोन दिवस ही लक्षणे दिसतात आणि त्यानंतर पुन्हा सर्व काही निघून जाते, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र हे साईड इफेक्ट्सदेखील काही उपायांनी टाळता येऊ शकतात, असं विविध डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ सांगतात. 

  देशात सध्या लसीकरणाच्या मोहिमेनं जोर धरलाय. जरी देशात उपलब्ध लसींची संख्या कमी असली,  तरी सरकार त्यासाठी प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. अनेकांना कोरोनावरील लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट्स जाणवतात. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती उत्पन्न होते. मात्र अशा प्रकारे घाबरण्याचं कारण नसून काही उपायांनी हे साईड इफेक्ट्स दूर ठेवता येतात, असं डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांचं मत आहे.

  कोरोनावरील लस घेतल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळे साईड इफेक्ट जाणवतात. काहीजणांना सौम्य ताप येतो, तर काहींंना अशक्तपणा जाणवतो तर काहींना अंगदुखी सुरू होते. काहीजणांना दंडात ज्या ठिकाणी लस टोचली जाते, त्या ठिकाणी वेदना व्हायला सुरुवात होते. एक ते दोन दिवस ही लक्षणे दिसतात आणि त्यानंतर पुन्हा सर्व काही निघून जाते, असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र हे साईड इफेक्ट्सदेखील काही उपायांनी टाळता येऊ शकतात, असं विविध डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ सांगतात.

  हे करा उपाय

  • तुमचं आवडतं संगीत ऐका. त्यामुळे हार्मोन्सवरील ताण कमी होऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल.
  • हर्बल टी प्या. यामध्ये मुबलक प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्स असतात.
  • शेंगदाणे आणि काही ड्रायफुट्स खा. यामध्ये मोठ्या संख्यने अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ऊर्जा मिळते.
  • हलका आणि स्ट्रेचिंगचा व्यायाम करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर फार ताण येणार नाही, मात्र शरीरातील सर्व अवयवांना मुबलक ऑक्सिजन पुरवठा होत राहिल.
  • पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. प्रत्येकाची झोपेची गरज वेगवेगळी असते. तुम्हाला नैसर्गिकरित्या जाग येईपर्यंत झोपा.
  • या काळात तेलकट, तुपकट पदार्थ टाळा आणि हेल्दी डाएटवर भर द्या.
  • मुबलक पाणी प्या. शरीर डीहायड्रेटेड होणार नाही, याची काळजी घ्या.
  • एवढं करूनही जर वेदना होत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलर्स घ्या.