Looking at computer screens 65 percent of people were diagnosed with eye strain and visual impairment

 डोळ्यांचा ताण( Trouble For Eyes) दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय(Tips For Refreshing Eyes) वापरू शकता.हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.

    कोरोना काळात(Corona) अनेकांना वर्क फ्रॉम होमची(work From Home) मुभा देण्यात आली आहे. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन क्लास सुरु आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात बहुतांश लोक बराच काळ लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर बसून आहेत. जास्त वेळ लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहण्यामुळे डोळे थकतात आणि डोळ्यांवर ताण येतो.

    डोळ्यांचा ताण( Trouble For Eyes) दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय(Tips For Refreshing Eyes) वापरू शकता.हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.

    गुलाबपाणी – डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता.  एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात गुलाबाचं पाणी मिसळा. त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यावर ठेवा. पाच मिनिटांनंतर हा कापूस काढा. असं दिवसातून तीन ते चार वेळा करा.डोळ्यांचा थकवा कमी होईल.

    पुदीना आणि तुळशीची पाने – डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुळस आणि पुदिन्याचाही तुम्ही वापर करू शकता. तुळस आणि पुदिन्याची पानं रात्रभर पाण्यात ठेवा. दुसर्‍या दिवशी कापूस या पाण्यात भिजवून तो डोळ्यावर ठेवावा. असं केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होईल. त्वचादेखील तणावमुक्त होण्यास मदत होते.

    थंड पाणी – अनेक तास स्क्रीनसमोर बसून काम केल्याने डोळे दुखु लागतात आणि जळजळतात. हा त्रास दूर करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. कामातून ब्रेक घ्या आणि थंड पाणी डोळ्यांवर शिंपडावं. असं केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल आणि ताणही निघून जाईल.