Today is World Heart Day, 7 Dangerous Reasons to Invite Heart Failure

हार्ट फेल्युअर म्हणजे नेमके काय याबद्दल मोठ्या प्रमाणात संदिग्धता आढळून येते. बरेचदा त्याची गल्लत हार्ट अटॅकशी केली जाते, नाहीतर म्हातारपण किंवा इतर आजारांची चिन्हे म्हणून त्याच्या लक्षणांकडे डोळे झाक केली जाते. सध्या सर्व कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांपैकी हार्ट फेल्युअर हे मृत्यूचे आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागण्याचे प्रमुख कारण आहे.

हार्ट फेल्युअर ( Heart Failure) अर्थात हृदय निकामी होत जाणे हा आपल्या देशामध्ये निदानाशिवाय सर्वाधिक प्रमाणात दुर्लक्षित राहणारा आणि वाढत्या मृत्यूदरास कारणीभूत ठरणारा आजार आहे. हृदयविकाराचे निदान झालेल्या रुग्णांपैकी जवळ-जवळ १७% रुग्ण हे निदान झाल्यानंतर ९० दिवसांमध्ये दगावतात असल्याचे नॅशनल हार्ट फेल्युअर रजिस्ट्रीने प्रसिद्ध केलेल्या एका वर्षाच्या कालावधीतील आकडेवारीतून आढळून आले आहे. इतका अधिक मृत्यूदर स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोगांच्या प्रकरणांतच आढळून येतो .

हार्ट फेल्युअर म्हणजे नेमके काय याबद्दल मोठ्या प्रमाणात संदिग्धता आढळून येते. बरेचदा त्याची गल्लत हार्ट अटॅकशी केली जाते, नाहीतर म्हातारपण किंवा इतर आजारांची चिन्हे म्हणून त्याच्या लक्षणांकडे डोळे झाक केली जाते. सध्या सर्व कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांपैकी हार्ट फेल्युअर हे मृत्यूचे आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागण्याचे प्रमुख कारण आहे व या आजाराचे भारतामध्ये जवळजवळ १० दशलक्ष रुग्ण आहेत .

कृष्णा कार्डिअक केअर सेंटरमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक पंजाबी म्हणाले, “आमच्या रुग्णालयात दर महिन्याला हृदयक्रिया बंद पडलेले अनेक रुग्ण येतात. अशा परिस्थितीने आम्हाला बेसावधपणातून सावधानतेकडे नेले. त्यामुळेच आम्ही या आजाराबद्दल आता अधिक बोलतो, त्याच्या सर्वसाधारण लक्षणांबद्दल तसेच लवकर निदान व उपचारांच्या आवश्यकतेबद्दल जनजागृती निर्माण करतो. कारण हृदयक्रिया बंद पडणे यांचा अर्थ हृदयाने पूर्णपणे काम करणे थांबवले असा नाही तर त्याचा अर्थ असा असतो की नेहमीच्या तुलनेत हृदय कमी क्षमतेने कार्य करत आहे आणि शरीराच्या गरजेपेक्षा कमी प्रमाणात रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा हृदय शरीराला करत आहे. त्यामुळेच कॉरोनरी आर्टरी डिसिज व हृदयविकाराचा झटका येणे, कार्डियोमायोपॅथी किंवा इन्फेक्शन, दारु पिणे, उच्च रक्तदाब व मधुमेहामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, हृदयातील झडपांचे आजार, कॉंजेंशियल आजार या सगळ्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. म्हणूनच ज्या आजाराचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे असा हा गंभीर आजार आहे. त्यामुळेच वारंवार रुग्णालयात दाखल व्हायला लागल्याने आजार बळावून रुग्णाचा मृत्यु होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठीही आजाराचे निदान लवकर होणे महत्वाचे आहे.”

हार्ट फेल्युअर म्हणजे काय?

हार्ट फेल्युअर हा एक दीर्घकालीन आणि हळुहळू गंभीर स्वरूप धारण (Dangerous Reasons )करत जाणारा आजार आहे, ज्यात कालांतराने हृदयाचे स्नायू कमकुवत किंवा ताठर होत जातात व त्यामुळे हृदयाचे आकुंचनप्रसरणाचे कार्य योग्य प्रकारे पार पडणे कठीण होऊन बसते. यामुळे धाप लागणे, झोपताना श्वासोच्छवास नीट करता येण्यासाठी डोक्याखाली उंच उशी घेण्याची गरज भासणे, पायाचे घोटे, पाय आणि पोटाच्या भागाला सूज येणे, अचानकपणे वजन वाढणे व सतत थकवा जाणवणे वा गळून गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू लागतात.

हार्ट फेल्युअरची कारणे कोणती ?(Dangerous Reasons to Invite Heart Failure) 

अनेक आनुषंगिक आजार व धोकादायक स्थितींमुळे हार्ट फेल्युअरची समस्या उद्भवू शकते. पूर्वी येऊन गेलेला हार्ट अटॅक हे त्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताण, धूम्रपान, अतिरिक्त मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन अशा जीवनशैलीशी संबंधित आजारपणांना कारणीभूत ठरणा-या गोष्टी भविष्यात हार्ट फेल्युअरचा त्रास चालू होण्याचा धोका वाढवितात:

१. हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब यांमुळे हृदयाला जरुरीपेक्षा अधिक श्रम पडतात. कालांतराने रक्ताभिसरणाचे कार्य करणा-या हृदयाच्या स्नायूंवर याचा ताण येतो.

२. कोरोनरी आर्टरी डिसीज: रक्तवाहिन्या चिंचोळ्या झाल्यास शरीराला ऑक्सिजनने समृद्ध रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होण्यावर मर्यादा येते. ही गरज पूर्ण करण्यासाठी हृदय अधिक जोराने आकुंचन प्रसरण पावते व परिणामी हृदयाचे स्नायू कमकुवत होतात.

३. हार्ट अटॅक: हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यांत फरक आहे. हार्ट अटॅक ही हृदयाशी संबंधित अचानकपणे घटणारी घटना आहे जिचा हृदयाच्या प्राथमिक कार्यावर थेट परिणाम होतो. पूर्वी येऊन गेलेल्या हार्ट अटॅकमुळे हृदयाला मोठी इजा झालेली असू शकते, म्हणजेच अशा व्यक्तीचे हृदय आपले रक्ताभिसरणाचे कार्य हार्ट अटॅक येण्यापूर्वीइतक्या क्षमतेने कधीच करू शकत नाही. या असमर्थतेची परिणती हार्ट फेल्युअरमध्ये होते.

४. मधुमेह: मधुमेहासारखे दुर्धर आणि जुनाट आधार उच्च रक्तदाबाचा आणि कोरोनरी आर्टरी डिसिजचा धोका वाढवतात व त्यातून तीव्र स्वरूपाच्या हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

५. कार्डिओमायोपॅथी: कार्डिओमायोपॅथी हा मद्यपान आणि/किंवा धूम्रपान किंवा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे किंवा अन्य अज्ञात कारणांमुळे होणारा आजार आहे.

६. लठ्ठपणा: वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास हृदयाच्या कार्यामध्ये अनियमितता येण्याचा धोका वाढतो तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांचा धोकाही संभवतो. शरीरात प्रमाणापेक्षा अधिक चरबी साठून राहिल्यास कालांतराने हृदयाच्या स्नायूंमधून जाणा-या रक्तप्रवाहामध्ये अडथळा येऊ शकतो व त्यामुळे हार्ट फेल्युअरच स्थिती उद्भवू शकते.

७. हृदयाचे ठोके अनियमित पडणे: हृदयाचे ठोके अनियमितपणे, विशेषत: कमी अंतराने व जलद पडत असल्यास हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात व त्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकते.

ही स्थिती टाळण्यासाठी एकूणच आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्याचा सल्ला दिला जातो. आपण नियमितपणे व्यायाम करायला हवा. धूम्रपान, मद्यपान किंवा अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर रहायला हवे आणि सकस व पोषक घटकांनी समृद्ध आहार घ्यायला हवा. याखेरीज प्रत्येकाने हृदयाची नियमित तपासणी करून घेण्याची सवय लावून घ्यायला हवी, म्हणजे कोणत्याही हृदयविकाराची शक्यता असल्यास त्याचे वेळीच निदान होऊ शकेल आणि त्यावर वेळच्यावेळी उपचार सुरू करता येतील.