मूळव्याधीने त्रस्त आहात?; मग करा हा सोपा उपाय

दोडक्याची पाने वाटून घेऊन त्याचा लेप केल्याने कुष्ठरोगामध्ये लाभ मिळतो. त्याचप्रमाणे दोडक्याच्या बियांचा लेपही कुष्ठरोगामध्ये लाभकारी आहे.

    दोडका (Turai) ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये (India) अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत. दोडका आणि दोडक्याच्या वेलीचा, व बियांचा निरनिराळ्या आजारांमध्ये उपचार म्हणून उपयोग केला जातो.

    मूळव्याधीचे दुखणे थांबवते
    दोडक्याची वेल गायीच्या दुधामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये उगाळून तीन दिवस घेतल्याने किडनी स्टोन्स विरघळू शकतात. तसेच डोळ्यामध्ये रांजणवाडी झाल्यास दोडक्याच्या वेलीच्या ताज्या पानांचा रस डोळ्यांमध्ये पिळल्यास रांजणवाडी बरी होण्यास मदत मिळते, हा रस तीन-चार दिवस, दिवसातून तीन चार वेळा, दोन ते तीन थेंब याप्रमाणे घालावा.

    ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल, त्यांच्यासाठी दोडक्याचे सेवन उत्तम आहे. ह्यामुळे मूळव्याधीचे दुखणे देखील बरे होण्यास मदत मिळते.


    केसांसाठी फायदेशिर

    लघवीस होणारी जळजळ, किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बरे करण्यासही दोडका सहायक आहे. दोडक्याच्या वेलीचे मूळ थंड पाण्यामध्ये उगाळून अंगावर आलेल्या फोडांना लावल्यास फोड कमी होऊ लागतात. दोडक्याचे तुकडे करून ते उन्हामध्ये वाळवावे.

    त्यानंतर ह्या वाळलेल्या तुकड्यांची पावडर बनवून ती पावडर नारळाच्या तेलामध्ये मिसळून केसांना लावावी. ह्या उपायामुळे पांढरे झालेले केस पुनश्च काळे होऊ लागतील. तसेच या तेलाच्या मालिशमुळे डोके शांत होऊन थंडावा मिळतो.

    कुष्ठरोगासाठीही लाभकारी
    अनेकदा शरीरावर चामखीळ येतात, त्यांमध्ये वेदना होऊ लागते, अश्यावेळी कडू झालेला दोडका पाण्यामध्ये उकळून घेऊन त्यानंतर त्याच पाण्यामध्ये एक वांगे उकडून घ्यावे. हे उकडलेले वांगे तुपावर परतून घेऊन त्यामध्ये गूळ घालून त्याचे सेवन करावे. ह्या उपायाने वेदना होत असलेले चामखीळ झडून जाण्यास मदत होते.

    दोडक्याची पाने वाटून घेऊन त्याचा लेप केल्याने कुष्ठरोगामध्ये लाभ मिळतो. त्याचप्रमाणे दोडक्याच्या बियांचा लेपही कुष्ठरोगामध्ये लाभकारी आहे. दोडक्याच्या सेवनाने गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते. तसेच घसा दुखत असल्यास दोडक्याच्या बिया तव्यावर टाकून त्याच्या धुराचा शेक घेतल्याने घसादुखी कमी होण्यास मदत होते.