बहुगुणी कोकमचे उपयोग

कोकमचा उपयोग आहराबरोबरच औषधी म्हणून देखील केला जातो. पित्तनाशक म्हणून कोकमचा उपयोग पूर्वी पासून केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे.

 कोकमचा उपयोग आहराबरोबरच औषधी म्हणून देखील केला जातो. पित्तनाशक म्हणून कोकमचा उपयोग पूर्वी पासून केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. जेवणामध्ये अनेक भाज्यांमध्ये कोकणचा वापर केला जातो. तसेच कोकमचा सरबत आणि सोलकढी देखील केली जाते. याचं बहुगुणी कोकमाचे आणखी उपयोग पाहुयात

 
कोकम पाण्यात टाकून त्याचा सरबत करून प्यायल्यास अपचन दूर होते.
 
जेवणात नियमित कोकमचा वापर केल्याने पित्त कमी होण्यास मदत होते.
 
अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
 
मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.