झटपट सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहिजे? हा एक व्यायाम करा

काही उंचवट्याचा वापर करून प्लान्क करण्याचा प्रयत्न करा.

  प्लान्क हा ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स’ मिळवण्याचा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. मग एकच कंटाळवाणा व्यायामप्रकार करण्यापेक्षा त्यात थोडी विविधता आणा आणि व्यायाम इंटरेस्टिंग बनवा.

  हाताचे कोपरे जमिनीवर टेकवून शरीर हळूहळू जमिनीपासून वर केले की प्लान्क होते. मात्र काही वेळाने एका पायावर शरीराचा भार सांभाळण्याचा प्रयत्न करा.

  काही उंचवट्याचा वापर करून प्लान्क करण्याचा प्रयत्न करा. बेंच किंवा खूर्चीवर पाय ठेवून हाताचे तळवे जमिनीवर ठेवा व शरीराचा भार सांभाळा.

  मेडीसीन बॉलच्या आधारे प्लान्क करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही दोन्ही हात बॉलवर ठेवून शरीराचा तोल सांभाळा. हा प्रकार सोपा वाटत असला तरीही थोड्या सरावाची गरज आहे.

  खांद्यांचा वापर करून तुमचे शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा. हळूहळू एका बाजूला वळण्याचा प्रयत्न करा व उजव्या किंवा डाव्या हाताचा आधार घेऊन शक्य होईल तितका वेळ याच स्थितीत रहा.

  टू पॉईंट प्लान्क हा देखील मजेशीर प्रकार आहे. सामान्य रुपातील प्लान्क करा आणि हळूहळू उजवा हात व डावा पाय यावर शरीराचा भार सांभाळण्याचा प्रयत्न करा.थोडा कठीण पण मजेशीर व्यायाम केल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटायला मद्त होईल.