
आजकालच्या गडबडीच्या जमान्यात लोकांचे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच अनेकांचे चालणे देखील कमी झाले आहे. त्यामुळे तब्बेत वाढण्याच्या, चरबी वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
आजकालच्या गडबडीच्या जमान्यात लोकांचे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच अनेकांचे चालणे देखील कमी झाले आहे. त्यामुळे तब्बेत वाढण्याच्या, चरबी वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या समस्येवर उपाय म्हणून अनेकजण जिम लावण्याचा विचार करतात. त्यामुळे जिम लावताना काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. वजनवाढी बरोबरोबरच वेट लॉस, फिटनेस, स्टॅमिना बिल्ट अप अशा विविध कारणांसाठी अनेकजण जिमची वाट धरतात. जिमचा विचार करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या गोष्टी कोणत्या ते खाली दिलेच आहे.
जिम लावताना ट्रेनर सोबत चर्चा करून आपले जिम लावण्याचे कारण सांगणे गरजेचे आहे.
ज्या ठिकाणी जिम साठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा असेल अशाच ठिकाणी जिम लावण्यास प्राधान्य द्यावे.
जिम साठी आरामदायी कपड्यांचा वापर करावा.
जिमिंग सुरू करण्याआधी आणि जिमिंग झाल्यानंतर लगेच पाणी किंवा ज्यूस पिणे टाळा. क्षणभर विश्रांती घेऊन मगच पाणी प्यावे.
आपण किती कॅलरीज कमी करतोय किंवा घेतोय याचा हिशोब असू द्या.
ट्रेनरचा सल्ला घेतल्याशिवाय दुसर्यांना पाहून कोणतीही नवीन मशीन ट्राय करू नका.