झटपट वजन घटवायचे आहे?; मग रात्री घ्या असा आहार

बदामात खुप पौष्टिक तत्वे असतात. यातील प्रोटीन मांसपेशीला दुरुस्त करते. शरीरातील चरबी कमी करण्यात याचा फायदा होतो.

  आहाराच्या बाबतीत असे म्हटले जाते, दिवसभरात जास्त आणि रात्री कमी जेवण (Diet) करावे. परंतू, हे अर्धसत्य आहे. रात्रीचे जेवण झोपण्याच्या अगोदर काही तासांपूर्वी करत असाल तर तुम्हांला कमी जेवण करायची गरज नाही.

  तुम्ही पोटभर जेवन करु शकता.जेवन करुन लगेच झोपत असाल तर तुम्ही काय खाताय याची काळजी घ्यावी. वजन कमी करायचे असेल तर फक्त डायटींग, व्यायाम करणे पुरेसे ठरत नाही.

  रात्रीचा आहार कमी कॅलरी असणारा घ्यावा. रात्रीच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश केल्यास तुम्ही वजनवाढीच्या समस्येवर नियंत्रण ठेवू शकता.

  ग्रीन टी
  वजन कमी करायचे आहे तर ग्रीन टी अवश्य घ्या. याचा खुप फायदा होतो व वेगाने वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे शरीरातील ईसीजी मेटाबॉलिझम प्रकिया वेगाने होते. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी घेणे फायदेशीर ठरेल.

  चेरी
  चेरीत ॲन्टिऑक्सिडंट पोटातील सुज कमी करण्यास मदत करतात. चेरीचे सेवन केल्याने वजन कमी होईल आणि चांगली झोप येईल.

  बदाम
  बदामात खुप पौष्टिक तत्वे असतात. यातील प्रोटीन मांसपेशीला दुरुस्त करते. शरीरातील चरबी कमी करण्यात याचा फायदा होतो. त्यामूळे वजन कमी होते. या गुणांमूळे बदाम अवश्य खावे.

  ब्रोकोली
  ब्रोकोली वजन कमी करण्यावर खुप गुणकारी आहे. ज्यांना वजन वाढीची समस्या जाणवते त्यांनी कच्ची ब्रोकोली खाणे खुप फायदेशीर ठरते. सलाडमध्ये याचा वापर केल्याने लवकर वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे याचा आहारात जरुर समावेश करावा.

  अंडे
  वजन कमी करण्यासाठी अंडी खाणे खुप फायदेशीर ठरते. उकडलेले अंडी खाणे एकीकडे भरपूर प्रमाणात प्रोटीन पुरवते. पण यामुळे शरीरातील चरबी जळण्यासही मदत होते. त्यामुळे रात्रीच्या आहारात अंड्याचा जरुर समावेश करा. अंडे खा फिट रहा.