वजन वाढलंय ? हे घरगुती उपाय करा अन् वजन कमी करा

सध्याच्या युगात फास्टफुड खाण्याचे प्रमाण वाढलं आहे. तसेच बदलती जीवनशैली, दिनचर्या खाण्यात येणारे विविध पदार्थ यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढत आहे.

 सध्याच्या युगात फास्टफुड खाण्याचे प्रमाण वाढलं आहे. तसेच बदलती जीवनशैली, दिनचर्या खाण्यात येणारे विविध पदार्थ यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अती लठ्ठ पणा लोकांमध्ये जाणवत आहे. हा लठ्ठपणा, वाढते वजन कमी करण्यासाठी अनेक जण जीम, व्यायाम, डाएट याचा आधार घेतात. मात्र तरीदेखील वजन कमी करण्यात अडथळे येतात. अशामध्ये काही घरगुती पदार्थांच्या मदतीने वजन कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

१. पपईचे सेवन करावे त्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
२. जेवणामध्ये दह्याचा समावेश करावा.
३. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होईल.
४. जेवणामध्ये मिरची, तेलाचा योग्य तितकाच वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. 
५. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.
६. रात्री जंक फूड जसं पिझ्झा, पास्ता, बर्गर इत्यादी खाणं बिल्कुल बंद करा. सोबतच शक्य असेल तर रात्री कोल्डड्रिंक आणि तळलेले पदार्थ खाऊ नये. याचं कारण रात्रीच्यावेळी आपली पचनक्रिया हळू काम करते. त्यामुळं जास्त फॅट बर्न होत नाही आणि लठ्ठपणा वाढतो.