zumba

जर तुम्हाला घरीच राहून(workout at home) आणि अगदी मजेशीर पद्धतीने असा व्यायाम करायचा असेल तर तुमच्यासाठी डान्स वर्कआऊट(dace workout) हा उत्तम पर्याय आहे. डान्स वर्कआऊटचे प्रकार(different types of dance workout) कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात.

  वजन कमी करणे(weight loss) हा १०० पैकी ९५ जणांच्या मनात तरी नक्कीच असेल. तुम्हालाही वजन कमी करण्याची इच्छा आहे. (how to reduce weight)पण तुमच्याकडून वर्कआऊट(types of dance workout) होत नसेल आणि डाएट होत नसेल तर तुम्हाला काहीतरी वेगळे ट्राय करायला हवे नाही का? जर तुम्हाला घरीच राहून आणि अगदी मजेशीर पद्धतीने असा व्यायाम करायचा असेल तर तुमच्यासाठी डान्स वर्कआऊट हा उत्तम पर्याय आहे.डान्स वर्कआऊटचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात.

  झुंबा(zumba)
  तुम्ही ‘झुंबा’ या डान्स प्रकाराबद्दल नक्कीच ऐकले असेल. झुंबा हा प्रकार पाश्चिमात्य वर्कआऊटचा प्रकार आहे. पण हल्ली यावर बॉलिवूडची गाणीदेखील लावली जातात आणि डान्स केला जातो. या वर्कआऊटमध्ये तुमच्या हात, पाय आणि कंबरेची योग्य पद्धतीने हालचाल केली जाते. त्यामुळे हा डान्स केल्यानंतर अगदी ५ मिनिटात तुम्हाला घाम येऊ लागतो.

  एरोबिक झुंबा(aerobic zumba)
  झुंबाचे एक अद्ययावत व्हर्जन म्हणजे एरोबिक झुंबा. एरोबिक झुंबा थोडा शिस्तबद्ध असतो. म्हणजे काही व्यायामाचे प्रकार डान्समध्ये गुंफण्यात आलेले असतात.तुम्ही वर्कआऊटमध्ये ज्या प्रमाणे रिपिटेशन करता अगदी तसेच सेट तुम्हाला यामध्ये करायचे असतात. आता यामध्येही विविधता आली. तुमच्या कंबर, पोटाकडील फॅट कमी करण्यासाठी एरोबिक झुंबा मदत करते.

  पोल डान्सिंग(pole dancing)
  ऐकायला वेगळा आणि करायला फारच सोपा असा हा डान्सचा प्रकार वाटत असला तरी हा डान्स करण्यासाठी तुम्हावा फारच मेहनत करावी लागते. जर तुम्ही अशापद्धतीचा डान्स प्रकार केला नसेल आणि तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर हा डान्स प्रकार तुम्ही नक्की करुन पाहा.

  बॉलरूम डान्स(ballroom dance)
  बॉलरूम डान्स हा डान्सचा एक प्रसिद्ध प्रकार आहे. हा प्रकार तुम्ही केवळ पार्टीसाठी केला असेल तर या डान्सचे फिटनेस महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला फिटनेस आणि डान्स करायचा असेल तर तुम्ही हा डान्स प्रकार करू शकता.

  बुटी योगा(booty yoga)
  कार्डिओमधला थोडा अधिक जास्त इंटेन्स असा बुटी योगा असतो. हा एक प्रकारचा ट्रायबल डान्सचा प्रकार आहे. तुमचे वजन कमी करण्यासोबतच तुमच्या शरीराला सुडौल बनवण्याचे काम हा व्यायामप्रकार करतो.