curd and sugar

बऱ्याचदा जेव्हा मुलं इंटरव्ह्यूसाठी जातात, परीक्षेसाठी (Exam) जातात किंवा आपले वडील एखाद्या कामासाठी घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्या हातावर दही-साखर दिली जाते. मात्र या पाठीमागे काही शास्त्रीय कारणं (Scientific Reasons) देखील आहेत

  जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कार्यासाठी घराबाहेर जातो त्यावेळेस आपली आई किंवा घरातली मोठी माणसं आपल्या हातावर दही-साखर (Curd And Sugar ) देतात. दही-साखरेमुळे यश (Success) मिळतं असं आई किंवा आजीचं म्हणणं असतं.

  बऱ्याचदा जेव्हा मुलं इंटरव्ह्यूसाठी जातात, परीक्षेसाठी (Exam) जातात किंवा आपले वडील एखाद्या कामासाठी घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्या हातावर दही-साखर दिली जाते. मात्र या पाठीमागे काही शास्त्रीय कारणं (Scientific Reasons) देखील आहेत.

  विविध कारणांमुळे डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा चीन सरकारचा प्रयत्न योग्य आहे, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  बहुगुणी दही – दही पचायला हलकं असतं (Easy to Digest). त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन बी १२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात. दही शरीरासाठी सुपरफूड आहे.

  आयुर्वेद काय सांगते ?

  आयुर्वेदानुसार देखील दही-साखर खाण्याचे काही फायदे आहेत. दही हे थंड प्रकृतीचं आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड करण्याचं काम ते करतं. तर, साखरेमध्ये ग्लुकोज असतं.जेव्हा दही आपल्या पोटामध्ये जातं तेव्हा, आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तर, साखरेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे परीक्षा किंवा जॉब इंटरव्ह्यूसाठीला जाताना दही साखर खाण्यामुळे आपला मेंदू आणि मन शांत राहतं आणि शरीरामध्ये उर्जा निर्माण होते.