woman thinking

आपल्या रोजच्या आयुष्यातील(busy life) काही गोष्टींमध्ये तुम्ही छोटासा बदल केला तर तुम्हाला तणावापासून(tension free life) मुक्ती मिळू शकते.  मानसिक आरोग्य(mental health) सुधारू शकते. या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूयात.

  सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात(life) अनेकांना मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. अनेकांना तर दिवसभरात इतका कामांचा ताप असतो की ते सतत एक वेगळ्या बर्डनखाली असतात. चिडचिड आणि मानसिक तणावामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. नकारात्मक विचार सतत डोक्यात आल्यानेदेखील मानसिक परिणाम होतो.

  आपल्या रोजच्या आयुष्यातील काही गोष्टींमध्ये तुम्ही छोटासा बदल केला तर तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळू शकते.  मानसिक आरोग्य सुधारू शकते. या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूयात.

  नकारात्मकता नकोच

  काही लोकांमुळे आणि जागेमुळे आपल्याला नकारात्मकता जाणवत असेल तर त्या व्यक्ती आणि ती जागा टाळलेलीच बरी. ज्या जागी तुम्हाला सकारात्मक वाटतं तिथे जा. ज्या व्यक्ती खूप आशादायी वाटतात त्यांच्या आसपास राहा.

  बोलून मोकळे व्हा

  एखादी गोष्ट आपल्या मनात साठून राहिली तर आपल्याला त्याचा त्रास होतो. त्यामुळे तुमच्या मनात असलेले दु:ख, टेन्शन तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. तुमच्या जवळची व्यक्ती कदाचित तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून देऊ शकते. तुमचे टेन्शन कमी करु शकते.मनावरचं ओझ कमी झाल्याने तुम्हाला मोकळ आणि छान वाटेल.

  वेगवेगळ्या गोष्टीत सहभाग

  नेहमी त्याच त्याच गोष्टी केल्याने कंटाळा येतो. अशावेळी वेळ काढून ऑफिस किंवा घराच्या आसपास असणाऱ्या योगा, नृत्य, मेडीटेशन अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आपोआप तुमचा ताण कमी होईल.

  समतोल आणि संतुलन

  अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींची आपण सरमिसळ करतो. आपल्या कामाच्या गोष्टी घरी आणू नये. तसेच घरातल्या गोष्टी कामाच्या ठिकाणापर्यंत नेऊ नये. तुमचा खूप ताण असे केल्याने कमी होईल.

  सजावट

  अनेकदा जागेमुळे आपला मूड बदलतो. कामाच्या ठिकाणी आपल्या डेस्कजवळ थोडीशी सजावट करा. यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटून मूडसुद्धा चांगला राहील. मानसिक स्वास्थ चांगले राहील.ताण राहणार नाही.

  नाश्ता 

  ऑफिस किंवा कॉलेजला उशीर व्हायला नको म्हणून अनेकजण सकाळी नाश्ता न करता बाहेर पडतात.  नंतर भूक लागल्यावर जे मिळेल ते जमेल त्यावेळी खाल्ले जाते. खूप वेळ उपाशी राहण्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे सकाळी नाश्ता कराच.