दारू असो वा सिगारेट; ‘या’ वनस्पतीने सुटतील सगळी व्यसनं

ही वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात त्याचा आपण योग्य रीतीने वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो.

    गोड चिंच इंग्लिश चिंच हे डायबिटीस लिव्हर तसेच अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्यासाठी ही वनस्पती खूप उपयुक्त आहे. व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा फायदा होतो. ही वनस्पती आपल्या आजूबाजूला असतात त्याचा आपण योग्य रीतीने वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो.

    गोड चिंच याला जंगली जिलेबी सुद्धा म्हटले जाते आणि ते फळ कच्चे असते तेव्हा हिरवे दिसते पिकते तेव्हा गुलाबी रंगाचा दिसते. जलेबी सारखा आकार असल्यामुळे त्याला जंगली जिलेबी असे म्हटले जाते. आयुर्वेदिक दृष्टीने अतिशय उपयुक्त ही वनस्पती आहे. यामध्ये प्रोटीन असते. कार्बोहायड्रेट ,फायबर असते. कॅल्शियम असते, फॉस्फरस, लोह, सोडियम, पोटॅशियम, विटामिन ए, विटामिन बी व विटामिन सी खूप मोठ्या प्रमाणात असते.

    त्या फळांमध्ये पांढरा गर असतो आणि त्याच्यामध्ये एक बी असते पण चीचोकी पेक्षा थोडे छोटे असते म्हणून याला चिंच असे म्हटलं जातं. ही एक काटेरी वनस्पती आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. याचे पान फुल आणि साल त्याच प्रमाणे मुळे अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर या वनस्पतीचे फळ नियमितपणे रोज जर खाल्ले तर तुमचा डायबिटीस थोडा कंट्रोलमध्ये येतो त्याच्या आतला गर आहे तो खायचा आहे आणि रक्तामध्ये जी शुगर आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याच प्रमाणे तुम्हाला कफ, अतिसार आजार असेल म्हणजे तुमचा पोट साफ होत नसेल तर तुम्हाला डायरिया त्रास होत असेल तर या वनस्पतीचे फळ त्याच्यावर खूप गुणकारी असतात.

    हे फळ आणि शेंग जर तुम्ही दररोज सात आठ दिवस जर खाल्ली तर तुमची पोट साफ न होण्याची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. जर तुमचा लिवर खराब झालेला असेल तर याचे जे पान आहे त्याचा काढा करून जर तुम्ही घेतला तर लिव्हरचा काम सुधारतं आणि जर तुम्हाला त्वचारोग झालेली असेल तर त्वचा रोग मध्येसुद्धा ही वनस्पती खूप महत्वाचं काम करते.