शिंकताना डोळे का बंद होतात?; ‘हे’ आहे कारण

‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’च्या एका प्रोफेसरांनी दिलेल्या माहितीनुसार श्‍वास घेताना श्‍वासनलिकेत एखादा धुळीचा कण अथवा अन्य सूक्ष्म पदार्थ गेल्यास तो शरीराबाहेर टाकण्यासाठी शिंकण्याची प्रक्रिया शरीराकडून अवलंबली जाते.

शिंकणे ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. मात्र, शिंकताना आपण आपोआप डोळे बंद करत असतो. कितीही प्रयत्न केला तरी शिंकताना डोळे मात्र आपण उघडू शकत नाही, हे निश्‍चित आहे. मग हे असे का होते, आणि या दोन्ही शारीरिक क्रियांचा परस्परांत कोणता संबंध आहे, असा प्रश्‍न निर्माण होतो.

‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’च्या एका प्रोफेसरांनी दिलेल्या माहितीनुसार श्‍वास घेताना श्‍वासनलिकेत एखादा धुळीचा कण अथवा अन्य सूक्ष्म पदार्थ गेल्यास तो शरीराबाहेर टाकण्यासाठी शिंकण्याची प्रक्रिया शरीराकडून अवलंबली जाते. मात्र, हेच कण जर मोठे असतील तर तो शरीराबाहेर फेकून देण्यासाठी फुफ्फुसात जास्त हवा भरण्याचा संदेश मेंदूकडून मिळतो. शिंकताना आम्ही जे डोळे मिटतो, त्या प्रक्रियेला ‘ट्राईजेमिनल नर्व्ह’ जबाबदार असते. हा नर्व्ह चेहरा, तोंड, नाक आणि आपल्या जबड्याला नियंत्रित करतो. श्‍वास नलिकेतील अडथळा हटवण्याचा जो मेंदूकडून मिळतो, तो या अवयवांनाही मिळतो आणि शिंकताना डोळे मिटले जातात व प्रक्रिया पूर्ण केली जाते.