खरंच का? ! कोरोनामुळे टक्कल पडण्याची शक्यता ; जाणून घ्या

कोरोना होऊ गेल्यावर रुग्णांना थकवा, खोकला, श्वास घ्यायला त्रास, वास न येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामध्ये भर पडलीय ती केस गळतीची. कोरोना होऊन गेल्यावर केस जात असल्याचीही काही रुग्णांची तक्रार आहे.कोरोनानंतर केस गळण्याच्या आणि टक्कल पडण्याच्या तक्रारी तुलनेनं कमी आहेत.

    गेल्या दीड वर्षांपासून अख्ख्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे सर्वजण त्रस्त आहेत. या महामारीमुळे अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागले. तर अनेकांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. कोरोना झाल्यानंतर काय होईल याचा काय नेम नाय. कोरोना झाल्यानंतरनवनवे साईड इफेक्टस समोर येतायत. आता तर कोरोनानंतर टक्कल पडण्याची भीती आहे. आता कोरोनाचा आणखी एक नवा दुष्परिणाम समोर आलाय. कोरोना तुम्हाला टक्कल पाडतोय. कोरोना होऊन गेल्यावर केस गळत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.

    कोरोना होऊ गेल्यावर रुग्णांना थकवा, खोकला, श्वास घ्यायला त्रास, वास न येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामध्ये भर पडलीय ती केस गळतीची. कोरोना होऊन गेल्यावर केस जात असल्याचीही काही रुग्णांची तक्रार आहे.कोरोनानंतर केस गळण्याच्या आणि टक्कल पडण्याच्या तक्रारी तुलनेनं कमी आहेत. पण तरीही तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर केसांची निगा राखणा-या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.