महिलांनो सावध व्हा!; निद्रानाशामुळे महिलांना मधुमेहाचा धोका

अपु-या वेळेमुळे पुरेशी झोप न मिळणे किंवा उशिरापर्यंत जागे राहणे. यामुळे झोपेसंबंधित आजार बळावत आहेत. मधुमेह प्रकार दोनमध्ये मागील १० वर्षात ६ हजार ४०७ रुग्णांची वाढ झाली आहे.

निद्रानाश हा आजार महिला वर्गात मधुमेहाच्या आजाराला निमंत्रण ठरू शकते. हा मधुमेह दोन प्रकारचा असू शकतो, असा हार्वड विद्यापीठात नवीन अभ्यासाद्वारे हा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही महिलेला झोपेसंबंधित कोणत्याही एका प्रकारचा आजार असेल तर त्या महिलेला ४७ टक्के मधुमेह होण्याची शक्यता आहे.

झोपेसंबंधित तक्रारी वाढल्यास मधुमेहाचा धोका ही वाढण्याची शक्यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हार्वर्डच्या टी. एच. स्कूलच्या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे.

अपु-या वेळेमुळे पुरेशी झोप न मिळणे किंवा उशिरापर्यंत जागे राहणे. यामुळे झोपेसंबंधित आजार बळावत आहेत. मधुमेह प्रकार दोनमध्ये मागील १० वर्षात ६ हजार ४०७ रुग्णांची वाढ झाली आहे. ज्या महिलांमध्ये दोनपेक्षा जास्त झोपेसंबंधित आजार असतील त्या महिलांना मधुमेह प्रकार दोन असण्याची शक्यता आहे. या आजारांमध्ये झोप न लागणे, सहा तासांपेक्षा कमी झोप घेणे, घोरणे आणि निद्रानाश होणे, अशा समस्यांचा समावेश आहे.