gym activity

देशातील ५३ टक्के महिलांची शारीरिक ॲक्टीविटी गरजेपेक्षा कमी आहे. बंगळुरूच्या एका फिटनेस ॲपने नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यातून हा खुलासा झाला आहे.

    एकिकडे फिटनेसबाबत(fitness) किंवा आहाराबाबत (diet)जागरूकता वाढत असली तरी बदलत्या लाइफस्टाइलमुळे (chnaging lifestyle)आरोग्यासंबंधी(health problems of women) वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. लोकांच्या शारीरिक क्रिया(physical activity) कमी झाल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागताना दिसतोय. अशात एका रिपोर्टनुसार, देशातील ५३ टक्के महिलांची शारीरिक ॲक्टीविटी गरजेपेक्षा कमी आहे. पुरुषांची स्थितीही फारशी चांगली नाही. तब्बल ४८ टक्के पुरुषांची शारीरिक क्रिया कमी आहे.

    बंगळुरूच्या एका फिटनेस ॲपने(fitness app) नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यातून हा खुलासा झाला आहे. या सर्व्हेनुसार बंगळुरू, गुरुग्राम येथील लोक त्यांच्या आरोग्याबाबत सर्वांत जास्त सतर्क आहेत तर कोलकाता, लखनौ आणि अहमदाबादचे लोक आरोग्याकडे सर्वांत कमी लक्ष देतात.

    या फिटनेस ॲपने २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास १० लाख भारतीयांच्या आरोग्यासंबंधी सवयींवर सर्व्हे केला. आणि त्या आधारावर ‘फिजिकल ॲक्टिविटी लेव्हल ऑफ इंडियन्स’ नावाचा रिपोर्ट तयार केला. यातून असे आढळून आले की, फिजिकल ॲक्टिविटीसोबतच महिला कॅलरी बर्न करण्यातही पुरुषांच्या मागे आहेत.

    महिलांनी एका दिवसात सरासरी जितक्या कॅलरी बर्न करायला हव्यात, त्याच्या केवळ ४४ टक्के कॅलरी त्या बर्न करू शकतात. तेच पुरुष एका दिवसात साधारण ५५ टक्के कॅलरी बर्न करण्यात यशस्वी ठरतात. रिपोर्टनुसार, महिलांनी एका दिवसात सरासरी ३७४ कॅलरी बर्न करायला हव्यात. पण यातील त्या केवळ १६५ कॅलरीच बर्न करु शकतात. तर पुरुषांनी एका दिवसात सरासरी ४७६ कॅलरी बर्न करायला हव्यात. पण ते त्यातील जवळपास २६२ कॅलरी बर्न करतात.

    कॅलरींचा थेट संबंध हा शारीरिक क्रियेंशी असतो. सर्व्हे करणाऱ्या ॲपचे अधिकारी सांगितात की, “ही फार चिंतेची बाब आहे की, देशातील अर्धी लोकसंख्या गरजेच्या फिजिलक ॲक्टिविटीच करत नाहीत. जर आपण देशातील महिला आणि पुरुषांना मिळून सांगितले जर प्रत्येक व्यक्ती गरजेच्या फिजिकल ॲक्टिविटीचे केवळ ५० टक्केच लक्ष्य मिळवू शकतात.

    याच सर्वांत मोठं कारण आहे रोजच्या वाईट सवयी आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश नसणे, याच सवयींमुळे जाडपणा, हायपरटेन्शन, डायबिटीजसारखे आजार होतात. सर्व्हेमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फिजिकल ॲक्टिविटीजचा ३० वयोगटाच्या आसपास असलेल्या लोकांमध्ये फारच खराब स्तर आहे.

    सर्व्हे करणाऱ्या ॲपने वेगवेगळ्या शहरातील लोकांचे फिटनेस बँड किंवा फोनमधील फिटनेस ॲपचा डेटा गोळा करून त्या आधारे निष्कर्ष काढले. यातून हेही समोर आले की, मोठ्या शहरातील लोक एक दिवसात सरासरी ४०७ कॅलरी बर्न करतात. तेच लहान शहरातील लोक एक दिवसात सरासरी ३७१ कॅलरी बर्न करू शकतात. म्हणजे मोठ्या शहरातील लोक छोट्या शहरातील लोकांपेक्षा अधिक ॲक्टिव आहेत.