ब्रा घालताना स्त्रिया करतात ‘या’ चुका; म्हणून वाढते स्तनांच्या बाजूची चरबी

चुकीच्या पद्धतीने ब्रा घातल्यास स्तनांच्या आजूबाजूला इतकी चरबी साठते की स्तन आणि शरीर दोन्ही बेढब दिसू लागते. काही जणींचा वरचा भाग बेढब दिसण्याची हीच प्रमुख कारणं असतात.

प्रत्येक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग जर कुठला असेल तर तो आहे ब्रा, पण ती योग्य तऱ्हेने घालणं अत्यंत गरजेचे असते. ब्रा घालताना तुम्ही जर काही चुका केल्यात तर त्याचे दुष्परिणामही होतात. विशेषतः ब्रा घालताना जर खाली दिलेल्यापैकी काही चुका करत असाल तर तुमच्या स्तनांच्या बाजूची चरबी वाढू शकते. त्यामुळे स्तनांच्या बाजूची चरबी वाढू द्यायची नसेल तर तुम्ही ब्रा घालताना काही चुका टाळणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने ब्रा घातल्यास स्तनांच्या आजूबाजूला इतकी चरबी साठते की स्तन आणि शरीर दोन्ही बेढब दिसू लागते. काही जणींचा वरचा भाग बेढब दिसण्याची हीच प्रमुख कारणं असतात. यासाठी कोणताही व्यायाम नाही तर ब्रा संदर्भातील योग्य माहिती तुमची मदत करू शकते. काय आहेत या चुका आपण जाणून  घेऊया.

सर्वात टाईट हुकमध्ये ब्रा घालणे

बँडच्या आकारावर तुम्ही श्वास घेतल्यानंतर ब्रा किती खेचली जाते हे ठरते. त्यामुळे तुम्ही नेहमी ब्रा चा शेवटचा हुक लावायला हवा असे नाही. तुम्हाला श्वास घेता येईल अशा तऱ्हेनेच योग्य हुकमध्ये ब्रा घाला. सर्वात जास्त त्रास शरीराची त्वचा ताणली गेल्याने होते. जेव्हा ब्रा खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की, सुरूवातीला नेहमीच ब्रा चा पहिला हुक लावला. शेवटचा हुक लाऊ नये.

सलग दोन – तीन दिवस तीच ब्रा वापरणे

काही जणींना सलग दोन – तीन दिवस एकच ब्रा वापरायची सवय असते. पण ही सवय अत्यंत वाईट आहे. याचे सरळ आणि साधे कारण म्हणजे ब्रा मध्ये असणारे इलास्टिक. जर इलास्टिक घालण्यासाठी एक दिवसाचा गॅप दिला नाही तर ते खेचले जाते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरील त्वचेवर होतो. इलास्टिक पुन्हा आपल्या मुख्य स्वरूपात येते आणि मग त्यामुळे तुमच्या स्तनांवर त्याचा परिणाम होतो. इलास्टिक खराब होते ही गोष्ट असली तरीही त्याचा मुख्य परिणाम तुमच्या स्तनांचा आकार बिघण्यावर होतो.

जास्त काळ एकाच ब्रा चा वापर

साधारण तीन ते चार महिन्यांनी तुम्ही वापरत असलेली ब्रा बदलली पाहिजे. पण तुम्ही एकच ब्रा सतत वापरत असाल आणि साधारण एक वर्ष तीच ब्रा घालत असाल तर त्याचा असा वापर करणे योग्य नाही. ब्रा वर एक्सपायरी तारीख नसली तरीही साधारण ८-९ महिन्याच्या कालावधीनंतर तुम्ही ब्रा बदलायला हवी. तुमच्या शरीराच्या आकारानुसार कमीत कमी वर्षातून दोन वेळा तरी ब्रा बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. विशेषतः नुकत्याच ब्रा घालायला लागलेल्या मुलींनी आणि त्यांच्या आईने हे लक्षात ठेवायला हवे.

प्रत्येक कपड्यांवर एकाच स्वरूपाची ब्रा घालणे

आता या वाक्याचा आणि स्तनांवरील चरबी वाढण्याचा काय संबंध असा विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल. पण काही कपड्यांमध्ये एका विशिष्ट प्रकारची ब्रा घालावी लागते. ज्याचा आकार प्लेन असतो. शर्ट्स अथवा अन्य कपड्यांमध्ये तुम्ही पुश अप ब्रा घालण्याची गरज नाही. तसंच वेगवेगळ्या कपड्यांसह वेगवेगळ्या ब्रा च्या आकाराची गरज भासते. अन्यथा तुमच्या अपर बॉडीला स्तनांचा योग्य सपोर्ट मिळत नाही. तुम्ही जर सतत एकाच स्वरूपाची ब्रा घालत राहिलात तर ब्रा चे वजन वाढते आणि स्तनांवर त्याचा परिणाम होतो. दिसायलाही ते चांगले दिसत नाही.

बऱ्याचदा ब्रा कॉटनची असेल तर ही समस्या उद्भवते. जेव्हा कॉटनच्या कपड्याचा धुऊन धुऊन आकार बदलतो तेव्हाही जर ती वापरली गेली तर त्याचा हुक ओढला जातो आणि तो वरच्या बाजूला चढतो. पण अशा तऱ्हेने ब्रा घालणे योग्य नाही. ब्रा चा हुक हा नेहमी समोरच्या बाजूने असायला हवा आणि जर ब्रा वरच्या बाजूने जास्त वर येत असेल ततर त्याचा उपयोग नाही आणि शरीराला ती योग्यरित्या सपोर्ट करत नाही. अशावेळी तुमच्या पाठीवरील चरबी वाढण्याची शक्यता असते. तसंच तुमच्या मानेवरील भागातही यामुळे चरबी वाढण्याची शक्यता असते. कारण तुम्ही तुमचे स्तन अशावेळी जबरस्तीने त्या ब्रामध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत असता आणि त्याचा चुकीचा परिणाम त्वचेवर होतो.