pco in women

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा आजार अनेक प्रजननक्षम वयाच्या स्त्रियांमध्ये आढळतो. या आजारामागची काही प्रमुख कारणे आहेत. स्थुलत्व, चुकीच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि टाईप २ मधुमेहाला कारणीभूत ठरणारी इन्सुलिनची वाढती पातळी यामुळे पीसीओएसची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा आजार अनेक प्रजननक्षम वयाच्या स्त्रियांमध्ये आढळतो. या आजारामागची काही प्रमुख कारणे आहेत. स्थुलत्व, चुकीच्या खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि टाईप २ मधुमेहाला कारणीभूत ठरणारी इन्सुलिनची वाढती पातळी यामुळे पीसीओएसची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

अर्थात, योग्य आणि समतोल आहारासोबतच नियंत्रित वजन, इन्सुलिनची निर्मिती आणि त्यावरील नियंत्रण यामुळे पीसीओएसचे स्त्रीच्या शरीरावर होणारे परिणाम टाळता येतात. पीसीओएसच्या संदर्भात इन्सुलिनचे नियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तसेच योग्य बॉडी मसल, मांस आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी केल्यानेही पीसीओएसमध्ये फायदा होतो. शिवाय यामुळे प्रजननक्षमता सुधारण्यासोबतच आरोग्याचे इतर अनेक फायदे होतात.(Women with PCO should include these foods in their diet)

१. फायबर किंवा तंतूमय पदार्थ असलेला आहार

हाय-फायबर म्हणजे अधिक तंतूमय पदार्थांचं सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. तसंच इन्सुलिन नियंत्रणात राहते. यासाठी आहारात ब्रोकोली, फ्लॉवर, हिरवी आणि लाल सिमला मिरची, रताळे तसेच बटाटा आणि बेरीज यांचा समावेश करावा.

२. जळजळ कमी करणाऱ्या पदार्थांचा समावेश

टोफू आणि कोंबडीच्या मांस यांसारखे पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. या पदार्थांमुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते. त्याचा फायदा पीसीओएसचा त्रास असणाऱ्या स्त्रियांना होतो. त्याचप्रमाणे, केळी, पालक, अक्रोड आणि बेरीज या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे अत्यंत नैसर्गिक पद्धतीने पीसीओएसचे नियंत्रण केले जाते.