demand for bicycles doubled during the corona virus crisis

सायकल चालवणे (Cycling) हा एक उत्तम व्यायाम आहे. धकाधकीच्या, तणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे.

  सायकल चालवणे (Cycling) हे आता शालेय आयुष्यापुरते किंवा व्यायामासाठी जिममध्ये किंवा ज्यांना सायकल आवडते त्यांच्यापुरते मर्यादित राहिले आहे. खरंतर, सायकल चालवणे (Cycling) हा एक उत्तम व्यायाम आहे. धकाधकीच्या, तणावाच्या काळात सायकल चालवण्याचा व्यायाम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आरोग्यदायी आहे.

  सायकल चालवल्यानं हृदय (Heart) आणि फुफ्फुसांचे (Lungs) आरोग्य चांगले राहते. सकाळी सायकल चालवल्यामुळे दिवसभर ऊर्जा (Energy) मिळते आणि रात्री झोपही (Sleep) चांगली येते. आज जागतिक सायकलिंग दिवस (World Cycling Day 2021) आहे. या निमित्ताने सायकल चालवण्याचे काही फायदे जाणून घेऊ या…

  • व्यायाम म्हणून काही वेळ सायकल चालवण्यामुळे रक्त पेशी (Blood Cells) आणि त्वचेला (skin) पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्यामुळं त्वचा निरोगी आणि तजेलदार होते.
  • तुम्ही सकाळी काही वेळ सायकल चालवत असाल तर तुम्हाला रात्री चांगली झोप (Sleep) येईल. सकाळी लवकर सायकल चालवण्यानं तुम्हाला थकवा येत असला तरी तो थोड्या काळासाठीच असेल. त्यानंतर संपूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जा मिळेल.

   फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

   View Results

   Loading ... Loading ...
  • सायकलिंगमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी (Immunity) अधिक सक्रिय होतात, त्यामुळं आजारपण कमी येते.
  • सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूच्या पेशी (Brain Cells) अधिक सक्रिय असतात. त्यामुळं त्यांची स्मरणशक्ती (Memory) इतर लोकांपेक्षा अधिक चांगली असते. सायकलिंगमुळे मेंदूत नवीन पेशीही तयार होतात.
  • सायकल चालवल्यानं हृदय निरोगी राहते. सायकलिंग केल्यानं संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण (Blood Circulation) उत्तम रीतीनं होण्यास मदत मिळते.
  • नियमित व्यायाम म्हणून सायकलिंग केल्यास शरीरातील कॅलरी (Calory) आणि चरबी (Fat) कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन (Weight) कमी होते. शरीरयष्टी सडपातळ राहण्यास मदत होते.
  • सायकल चालवताना आपण नेहमीपेक्षा अधिक खोल श्वास घेतो पर्यायानं अधिक ऑक्सिजन घेतो. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि त्याच वेळी फुफ्फुसांमध्ये हवा वेगानं आतबाहेर होते. यामुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारते आणि फुफ्फुस मजबूत होतात.