The price of milk at age is Rs. 150 per ml. What is the quality of donkey's milk?

जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार २००१ पासून दरवर्षी १ जून रोजी संपूर्ण जगात दूध दिवस साजरा(World Milk Day) केला जातो.

  आज १जून. या दिवशी जगभरात जागतिक दूध दिवस (World Milk Day) साजरा केला जातो.  मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.

  जागतिक दूध दिवस १ जूनलाच का ?
  जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार २००१ पासून दरवर्षी १ जून रोजी संपूर्ण जगात दूध दिवस साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये १ जून रोजीच दुग्ध दिवस साजरा केला जात असे. त्यामुळे २००१सालापासून १ जून या तारखेलाच दूध दिन साजरा करण्यात येऊ लागला.

  हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेमध्ये जागरुकता पसरवणं आणि वाढवणं असा आहे. तसंच लोकांना दुधाच्या बाबतीत अधिक ज्ञान मिळू शकेल, जेणेकरुन दुधाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व लोकांना पटेल.

  ‘दूध है Wonderful पियो Glass Full’ असं गाणं आपण ऐकलं असेल पण दूध पिण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? आहारतज्ञांच्या मते दूधामध्ये शरीरासाठी आवश्यक असे अनेक घटक आहेत.त्यामुळे रोज दूध प्यायला हवे.

  दूधातून मिळणारे घटक – कॅल्शियम, मॅगनिशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन, बी१२, प्रोटीन, आरोग्यदायक फॅट

  दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारच्या माध्यमातून केले जाते.

  आज जगभरात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत आहे. भारताने दूध उत्पादनातून जागतिक स्तरावर वेगळं स्थान प्राप्त केलं आहे. दरम्यान मिल्क मॅन अशी ओळख असलेले वर्गिस कुरियन हे भारतातील धवल क्रांतीचे जनक आहेत. कुरियन यांनी ‘अमूल’च्या माध्यमातून देशात दुग्ध क्रांती घडवली होती.