मधुमेहावरच्या त्रासावर ‘हे’ योग आहेत रामबाण उपाय

डायबेटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी हे आहेत काही खास आसने. या आसनांद्वारे तुम्ही जरुर रहाल फिट  ॲण्ड फाईन

अर्ध मत्स्येंद्रासन

सुरूवातीस दोन्ही पाय पुढच्या दिशेला सरळ करा. मग डावा पाय वाकवून उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ आणा. आता उजवा पाय वाकवा. पाठीचा कणा ताठच ठेवा. उजवा हात डाव्या गुडघ्याजवळ आणा आणि डावा घोटा धरून ठेवा. उजवा पंजा नितंबाच्या मागे ठेवा. हळूवार उच्छवास करत पाठ, खांदे आणि हात उजव्या दिशेला वळवा. याच अवस्थेत किमान ५ ते १० सेकंद थांबा. त्यानंतर श्वास आत घेऊन मुळ स्थितीत परत या. हीच प्रक्रिया डाव्या बाजूनेसुद्धा करा. तुम्हाला जर घोटा धरणे शक्य नसले तर हेच आसन तुम्ही गुडघा धरूनही करू शकता. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींना या आसनाचा चांगला उपयोग होतो.

अपन्न आणि वायू मुद्रा –

सुखासन किंवा वज्रासनमध्ये बसा. रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टोक त्या त्या हाताच्या अंगठ्याला जुळवा. इंडेक्स फिंगर आणि करंगळी ताठ ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि श्वासोच्छवासावर लक्ष ठेवा. ५ ते १० मिनीटांसाठी या मुद्रेमध्ये रहा. या मुद्रेसोबतच वायू मुद्रासुद्धा करा. वायू मुद्रेमध्ये इंडेक्स फिंगर वाकवून त्याच्यावर अंगठा ठेवा. ही मुद्रा मिनीटे करा. या दोन्ही मुद्रा सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी कराव्यात. या दोन्ही मुद्रांमुळे डायबेटीस नियंत्रणात येते. तसेच शरीराच्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठीही या मुद्रांची मदत होते आणि ताण कमी होतो.

नाडी शोधन प्राणायम-

सुखासनात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. डावा हात अपन्न मुद्रेमध्ये ठेवा. उजवी नाकपुडी अंगठ्याच्या सहाय्याने बंद करा. डाव्या नाकपुडीने मोठा श्वास घ्या आणि डावी नाकपुडी बंद करा. आता उजव्या नाकपुडीने उच्छवास करा. पुन्हा उजव्या नाकपुडीने मोठा श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने उच्छवास करा. अशाप्रकारे, तीन मिनीटे असे करत रहा.

मन्डुका मुद्रा-

वज्रासनामध्ये बसा. वज्रासनामध्ये बसणे शक्य नसेल तर सुखासनामध्ये बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि हळू श्वास घ्या. आता वेगाने उच्छवास करा. पोट आत घ्या. दोन्ही मुठी बंद करा आणि बेंबीच्या खाली दोन्ही बाजूस ठेवा. पुढे झुका, डोके वरच्या दिशेस असू द्या. या अवस्थेत श्वास घेऊ नका. शक्य असेल तितका वेळ या अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा या अवस्थेत श्वास धरून ठेवणे शक्य होणार नाही, तेव्हा उभे रहा आणि उच्छवास करा. हि प्रक्रिया साधारण ३ ते ५ वेळा रिपीट करा. मुठी बंद करून पोटावर ठेवल्याने स्वादुपिंडावरील दाब वाढतो आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. अपचनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना या मुद्रेमुळे आराम मिळतो. पण, हे करत असताना जर चक्कर आल्यासारखे जाणवले तर शवासनामध्ये जाऊन विश्रांती घ्यावी.