फक्त आरोग्यासाठीच नाही तर सोंदर्यासाठीसुद्धा दही उपयुक्त

दही पचन क्षमतेला वाढवते. दह्या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतं. ह्याचा दररोज सेवन केल्याने पोटाचे बरेचशे आजार बरे होतात

  बरेच लोक जेवणात नियमितपणे दही खातात, पण हे कोणाला आवडत नसल्यास, दह्या मध्ये लपलेले आरोग्य आणि सौंदर्याचे रहस्य कळल्यावर दररोज दही खाण्यास सुरू करतील.
  1. दह्याच्या दररोजच्या सेवनाने शरीरात आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. दह्यात ओवा मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
  2. उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी प्यायल्याने पोटाची उष्णता शांत होते. हे पिऊन निघाल्यावर देखील बाहेरच्या उष्णतेपासून संरक्षण होते.
  3. दही पचन क्षमतेला वाढवते. दह्या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतं. ह्याचा दररोज सेवन केल्याने पोटाचे बरेचशे आजार बरे होतात.
  4. दह्याच्या दररोजच्या सेवनाने सर्दी आणि श्वसन नलिकेच्या संसर्गापासून बचाव होतो.
  5. अल्सर सारख्या आजारात देखील दह्याच्या सेवनाने विशेष फायदे मिळतात.
  6. तोंड आले असल्यास किंवा तोंडात छाले झाले असल्यास दह्याचे गुळणे केल्याने छाले बरे होतात.