औंढा-जिंतूर महामार्गावर कारचा भीषण अपघात, ४ जण जखमी

औंढा-जिंतूर ( Aundha-Jintur highway ) महामार्गावरील धार माथा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंगोली : औंढा-जिंतूर महामार्गावर ( Aundha-Jintur highway ) कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवार) १२ वाजतेच्या सुमारास घडली आहे. महामार्गावरील धार माथा गावाजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही जखमी प्रवाशी बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु हा अपघात नेमका कसा झाला. हे अद्यापही अस्पष्ट आहे.