२० मिनिटात गाडी पाठव; नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

गाडी मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

  हिंगोली (Hingoli).  गाडी मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

  २० मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, असा दमच बांगर यांनी भरल्याचं संबंधित ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळतं. या कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर समोर आली आहे.

  काय आहे संवाद?
  गाडी पाठवणारी व्यक्ती : हॅलो
  आमदार संतोष बांगर : हा साहेब
  गाडी पाठवणारी व्यक्ती : हा दादा, गाडी आता इथून निघाली थाळीगावहून… ती गाडी अर्ध्या-पाऊण तासात पोहोचेल बघा तिथे तुम्हाला.
  आमदार संतोष बांगर : लय बोर व्हायले बघा मी, इमानदारीने… तुम्हाला खोटं सांगत नाही मी.. एकही गाडी 108 ची चालू देणार नाही… मी सांगतो उभ्या गाडीत रॉकेल टाकून फुकून देईन
  गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा.. दादा..
  आमदार संतोष बांगर : काय दादा-दादा… जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला जायचंय आणि तुम्ही म्हणता की गाडी नाही. दोन घंटे झाले वाट पाहून राहिलो
  गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा बरोबर आहे, पण दोन गाड्या नांदेडला गेल्या. थाळीगावहून गाडी पाठवतो.
  आमदार संतोष बांगर : दोन तासापासून राहते का?
  गाडी पाठवणारी व्यक्ती : बरोबर आहे
  आमदार संतोष बांगर : मी तुम्हाला सांगतो, मला 20 मिनिटात गाडी पाहिजे तिथे, नाहीतर उद्यापासून… गाडी मी पेट्रोल टाकून फुकून देईन पाहा.
  गाडी पाठवणारी व्यक्ती : काहीच प्रॉब्लेम नाही
  आमदार संतोष बांगर : मला लवकरात लवकर गाडी पाहिजे. दोन तास झाले मी वेट करुन राहिलो तुमच्या गाड्यांची
  गाडी पाठवणारी व्यक्ती : मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलंय
  आमदार संतोष बांगर : काय धंदा झाला का… दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हद्द झाली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष… त्याला संभाजीनगरला न्यायचं आहे. त्याची तब्येत बराबर नाही.. आणि तुम्ही असे करायला लागले. चुकीचं नाहीतर काय तुमचं
  गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा बरोबर आहे
  आमदार संतोष बांगर : मला काही सांगू नका.. ताबडतोब 20 मिनिटात गाडी आली पाहिजे तिथे… दोन घंट्यापासून थाळीगावहून गाडी येते?
  गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा आली आहे गाडी आता तिथं
  आमदार संतोष बांगर : बाकीची कामं सोडा आणि ती कामं करा आधी
  गाडी पाठवणारी व्यक्ती : हो दादा, गाडी पाठवतो.