हिंगोलीत जाणवले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीत आज (31 जानेवारी) पहाटे एक वाजेच्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसले आहेत. याची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. यासंदर्भातली माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे. 27 जानेवारीला पुण्यातील पुरंदर परिसरात देखील भूकंपाचे धक्के बसले होते.

हिंगोली (Hingoli).  हिंगोलीत आज (31 जानेवारी) पहाटे एक वाजेच्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसले आहेत. याची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. यासंदर्भातली माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे. 27 जानेवारीला पुण्यातील पुरंदर परिसरात देखील भूकंपाचे धक्के बसले होते.

पुण्याच्या पुरंदर परिसरात भूकंपाचे धक्के
पुणे जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी (27 जानेवारी) सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. पुरंदर परिसरात 2.6 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली. या भूकंपाच्या झटक्यात जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मंगळवारी सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी हा भूकंप झाला. मात्र, काही काळ नागरिकांमध्ये भीती पसरली होती. २.६ रिश्टर स्केलचा भूकंप सौम्य गटात मोडतो.

मराठवाड्यातल्या हिंगोली (hingoli) जिल्ह्याचा काही परिसर गुढ आवाजानं हादरुन गेला होता. वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी ह्या तीन तालुक्यात गुढ आवाज येत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गावात कालपासून काही वेळेस गुढ आवाज आला आहे. रिश्टर स्केलवर 3.2 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. यात मनुष्यहानी झालेली नाही; पण एका घराची भिंत पडल्याची प्राथमिक माहिती आहे. काल शनिवारी दुपारच्या वेळेत दिवसभरात दोन वेळेस पांगरा शिंदे गावात गुढ आवाज आले. त्यानं भयभीत होऊन गावकरी रस्त्यावर आले होते. प्रशासनही ह्या आवाजानं सतर्क झालं आहे.

पांगरा गावात पुन्हा पुन्हा आवाज!
पांगरा शिंदे गावात भूगर्भातून आवाज येण्याची ही काही पहिली वेळ नाही. आतापर्यंत शंभर वेळेस तरी असा आवाज आल्याची माहिती गावकरी देतात. हा आवाज नेमका कशाचा आहे याचा शोध घेण्यासाठी जवळच्याच स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भूगर्भतज्ञ भेट देऊन गेले पण त्यांनाही ठोस असा काही उलगडा झाला नाही. पण या आवाजामुळे फक्त वसमतच नाही तर कळमनुरी, औंढा नागनाथ ह्या तालुक्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

कळमनुरीतल्या गावातही आवाज
कळमनुरी तालुक्यातल्या पोतरा गावातही असेच जमीनीखालून आवाज येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणनं आहे. गेल्या आठवड्यात(18 जाने.) रिश्टर स्केलवर सौम्य भूकंपाची नोंदही केली गेली आहे. डिसेंबर महिन्यात तर 4 वेळेस असे आवाज झाल्याचं गावकऱ्यांनी तक्रार केली आहे. सौम्य भूकंपाच्या धक्क्यात एका शेतकऱ्याची विहिर कोसळली आहे. पण इतर कुठली जीवितहाणी झालेली नाही.