
आज पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. युपीए सरकारच्या काळात २० पैसे वाढले तरी विरोधक बोंबाबोंब करायचे मात्र गतवर्षी पेट्रोल १२ रुपयांनी वाढले आहे. आता कुठे आहेत ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.
हिंगोली : राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमाच्या चौथ्या दिवसाची सुरूवात गोंदिया जिल्ह्यात सुरू झाली. यावेळी काल एका भगिनीने BHEL चालू करा म्हणून आग्रह धरला पण त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. असा टोला लगावतानाच एक ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोंदिया येथील सभेत केला.
आज पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. युपीए सरकारच्या काळात २० पैसे वाढले तरी विरोधक बोंबाबोंब करायचे मात्र गतवर्षी पेट्रोल १२ रुपयांनी वाढले आहे. आता कुठे आहेत ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.
#राष्ट्रवादीपरिवारसंवाद दौऱ्यानिमित्त आज चौथ्या दिवसाची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून झाली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीतनंतर जाहीर सभेला प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. @praful_patel यांनी संबोधित केले. #rashtravadiparivarsanvad pic.twitter.com/x7lfXu9Bl4
— NCP (@NCPspeaks) January 31, 2021
खासदार प्रफुल पटेल यांनी नेहमीच इथल्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या कामासाठीही ते सतत संपर्कात आहेत म्हणून येणाऱ्या आर्थिक वर्षात धापेवाडा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १०० कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न करू त्याच पद्धतीने पुढच्या टप्प्यांचेही काम केले जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.