काँग्रेस खासदार राजीव सातव अनंतात विलीन, हिंगोलीत अंत्यसंस्कार

काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार राजीव सातव (Congress general secretary and Rajya Sabha MP Rajiv Satav) यांचे पुण्यात उपचारादरम्यान या (treatment in Pune) रविवारी पहाटे निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सातव यांच्यावर आज, सोमवारी सकाळी मसोड (Masod) (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार झाले.

  हिंगोली (Hingoli).  काँग्रेसचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार राजीव सातव (Congress general secretary and Rajya Sabha MP Rajiv Satav) यांचे पुण्यात उपचारादरम्यान या (treatment in Pune) रविवारी पहाटे निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सातव यांच्यावर आज, सोमवारी सकाळी मसोड (Masod) (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार झाले.

  राजीव सातव यांच्या मुळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते व राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. सातव यांच्या निधनाने हिंगोलीतील अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.

  राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून करोनाची लक्षणे जाणवत होती. २२ एप्रिलला त्यांच्या करोनाच्या चाचणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे त्यांनी स्वतःच ‘ट्वीट’द्वारे जाहीर केले होते. त्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर २३ एप्रिलपासून उपचार सुरू होते. २८ एप्रिलला त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही पुण्यात त्यांच्या उपचारासाठी आले होते. त्यांना मुंबईला रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न काँग्रेसजनांकडून सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने हलविण्यात आले नाही. उपचारांदरम्यान नऊ मे रोजी त्यांच्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने ते करोनामुक्त झाले. मात्र, दीर्घ आजारामुळे त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने गुंतागुंत वाढली आणि विविध अवयवयांना संसर्ग होऊन रविवारी पहाटे चार वाजून ५८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

  राजीव सातव यांचा अल्पपरिचय
  राजीव सातव यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात २००२मध्ये झाली. कळमुरी पंचायत समिती सदस्यपदी ते निवडून गेले. त्यानंतर २००७मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य बनले आणि त्याच वेळी त्यांची कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी नियुक्ती झाली. ते २००८मध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. उत्तम वक्तृत्वशैली, कुठल्या मुद्द्यावर विरोधकांना गार करायचे याची पुरेपूर जाण असलेला युवा नेता अशी त्यांची दिल्लीतील काँग्रेस वर्तुळात ओळख झाली. राजीव सातव यांनी राहुल गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

  सातव २००९मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले. नंतर २०१०मध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. २०१४मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. त्यापैकी एक राजीव सातव होते. २०१९मध्ये भाजपची सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता आली.

  काँग्रेससाठी अडचणीचा काळ होता. अनेक काँग्रेस नेते भाजपमय झाले. पण राजीव सातव काँग्रेससोबत राहिले. केंद्रात भाजपचा मुकाबला करण्यासाठी तरुणांची फौज काँग्रेसकडे आवश्यक होती. हे हेरून श्रेष्ठींनी मार्च २०२०मध्ये राजीव सातव यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्ती केली होती.