पोलिस कर्मचाऱ्याने गोळी झाडून केली आत्महत्या

  • पोलीस कर्मचाऱ्याचे नाव जितेंद्र साळी असे आहे. ते हिंगोली पोलीस दलात शस्त्रास्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत होते, त्यांनी एसएलआर रायफलद्वारे स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. अशी बातमी पोलीस दलातील सुत्रांकडून मिळाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे मुख्य कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत हिंगोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंगोली – हिंगोलीत एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पोलीस दलात कार्यरत होते. ४५ वर्षीय कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयात शनिवारी दुपारच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

पोलीस कर्मचाऱ्याचे नाव जितेंद्र साळी असे आहे. ते हिंगोली पोलीस दलात शस्त्रास्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत होते, त्यांनी एसएलआर रायफलद्वारे स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. अशी बातमी पोलीस दलातील सुत्रांकडून मिळाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे मुख्य कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत हिंगोली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नैराश्येतून आत्महत्या करण्याच प्रमाण वाढल

राज्यात नैराश्येतून आत्महत्या करण्याच प्रमाण वाढल आहे. कोरोना वायरसचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्व नागरिक घरात अडकून पडले आहेत. कामाच्या वेळा आणि ताण तणाव मुळे पोलीसांत संताप आहे. त्यांचा आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. यामुले कंटाळून आसे टोकाचे पाऊल उचलाताना दिसत आहेत.