ऑक्टोबरमध्ये दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेची शक्यता ?

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावीमध्ये जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये १ लाख ८० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे एटीकेटी ज्यांना प्राप्त होते जे दोन विषयांमध्ये ज्यांना कमी गुण प्राप्त झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपण ११ वीत प्रवेश देतो. तसेच त्यांच्यासाठी एक संधी सुद्धा उपलब्ध करून देतो.

हिंगोली :  दहावी आणि बारावीमध्ये यावर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांची ऑक्टोंबरमध्ये फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड सध्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. तसेच हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांची बैठक पार पडली.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावीमध्ये जवळपास १ लाख २५ हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये १ लाख ८० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे एटीकेटी ज्यांना प्राप्त होते जे दोन विषयांमध्ये ज्यांना कमी गुण प्राप्त झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपण ११ वीत प्रवेश देतो. तसेच त्यांच्यासाठी एक संधी सुद्धा उपलब्ध करून देतो. की जेणेकरून ते पुन्हा परीक्षा देऊ शकतील. त्यामुळे दहावी आणि बारावीमध्ये नापास आणि एटीकेटी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत.

यावर्षी संपूर्ण राज्यात दहावीचा निकाल ९५.३० ट्क्के लागला आहे. यामध्ये ९३.९० टक्के मुले पास झाले आहेत. तर ९६.९१ टक्के मुली पास झाल्या आहेत. परंतु मुलींचा निकाल ३.१ टक्क्यांनी जास्त लागला असून कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.