सेनगांव परिसरात पावसाची उघडीप, सोयाबीन पीक धोक्यात, शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यामध्ये मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचा हंगाम धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सेनगांव परिसरामध्ये सध्या पावसाअभावी सोयाबीन पीक करपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यामध्ये मागील पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचा हंगाम धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सेनगांव परिसरामध्ये सध्या पावसाअभावी सोयाबीन पीक करपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसून येत आहे अगोदरच कोरोना आणि त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा लावगड खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झालेला आहे

    दरम्यान काही शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था असल्याने त्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून आपली पिके ते जगवताना दिसून येत आहेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले असल्याने शेतकरी राजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.