गाठी व्यवसायावर कोरोना भारी ; भाव कमी तरी विक्री नाही

इतवारा बाजारातील लक्ष्मी गृह उद्योगाचे संचालक राजेश मोतीलाल साहू यांनी सांगितले की, 2007 पासून त्यांचे मोठे बंधू शरद साहू हे या व्यवसायासोबत जुळले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असताना देखील गाठीची विक्री होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे तयार झालेल्या गाठ्या जिल्ह्याच्या विविध भागात विकल्या जातात.

  अमरावती. होळी सणाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. होळी हा आनंद आणि उत्साहाचा सण. मात्र, कोरोना संक्रमणामुळे या उत्साह व आनंदावर पाणी फेरल्या गेले आहे. कोरोनामुळे होळीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गाठी व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. गाठी व्यवसायावर यंदा 50 टक्के परिणाम झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे होळीवर कोरोना भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.

  इतवारा बाजारातील लक्ष्मी गृह उद्योगाचे संचालक राजेश मोतीलाल साहू यांनी सांगितले की, 2007 पासून त्यांचे मोठे बंधू शरद साहू हे या व्यवसायासोबत जुळले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असताना देखील गाठीची विक्री होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे तयार झालेल्या गाठ्या जिल्ह्याच्या विविध भागात विकल्या जातात. एक महिना पूर्वीपासूनच ते गाठी तयार करण्याचे काम सुरू करतात. मात्र,

  यंदा त्यांनी केवळ 8 कामगारांसह गाठ्या तयार करण्याचे काम 15 दिवसांपूर्वी सुरू केले. दररोज 400 किलो गाठी तयार केली जाते. साखरेला उकळून पाणी केले जाते. त्यानंतर साच्यानुसार गाठीला आकार दिला जातो. गाठी विविध प्रकारच्या असून त्यामध्ये 151 रुपयांपासून 551 रुपयांपर्यंत गाठी उपलब्ध करून दिली जाते. हिंदू धर्मानुसार होळी पर्व दोन दिवसांपर्यंत साजरे केले जाते. होळी दहन केले जाते. त्या दिवशी मिठान्न म्हणून गाठी अर्पण केली जाते. तर दुसरीकडे एक दुसऱ्यांना गाठी भेट म्हणून दिली जाते. विशेष करून मुलांना गाठी विशेष करून आवडते. त्यामुळे गाठीला सर्वाधिक मागणी असते. मात्र, यंदा कोरोनामुळे मुले, वृद्धांना घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने रंग आणि गाठी व्यवसायाला सर्वाधिक फटका बसणार आहे.

  भाव कमी तरी विक्री नाही

  कोरोना संक्रमणामुळे आर्थिक स्थिती चांगली नाही. मध्यमवर्गीय नागरिकांना सर्वाधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यंदा एक किलो गाठी खरेदी करणारा एक पाव नेत आहे. ठोकमध्ये गाठी 60 ते 62 रुपये किलोने विकली जात आहे.

  राजेश साहू, संचालक लक्ष्मी गृह उद्योग