VIDEO : वृंदावनमध्ये होळीची धूम, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची ऐशीतैशी

वृंदावनमधील होळी देशातील लक्षवेधी होळी मानली जाते. उत्तर प्रदेशसह देशभरातील वेगवेगळ्या भागातले भाविक होळीचा आनंद लुटण्यासाठी वृंदावनला हजेरी लावत असतात. यंदा मात्र कोरोनाचं सावट असल्यामुळं होळी साध्या पद्धतीनं आणि गर्दी न करता साजरी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. मात्र तरीही नागरिकांनी तुडुंब गर्दी करत होळी साजरी केल्याचं चित्र दिसलं. 

    होळी हा हिंदु धर्मियांचा एक महत्त्वाचा सण. देशातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं होळी साजरी होत असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची आणि एकमेकांना रंग लावण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात या दिवसाला धुळवड म्हणतात. यंदाच्या होळी सणावर कोरोनाचं सावट असल्यामुळं शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक असताना काही ठिकाणी सर्रास या नियमांना पायदळी तुडवलं जात असल्याचं चित्र आहे.

    वृंदावनमधील होळी देशातील लक्षवेधी होळी मानली जाते. उत्तर प्रदेशसह देशभरातील वेगवेगळ्या भागातले भाविक होळीचा आनंद लुटण्यासाठी वृंदावनला हजेरी लावत असतात. यंदा मात्र कोरोनाचं सावट असल्यामुळं होळी साध्या पद्धतीनं आणि गर्दी न करता साजरी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. मात्र तरीही नागरिकांनी तुडुंब गर्दी करत होळी साजरी केल्याचं चित्र दिसलं.

    वृंदावनमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र आले आणि त्यांनी होळीच्या रंगात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र हे करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पूर्णतः पायदळी तुडवण्यात आलं. अनेक भाविकांनी मास्कदेखील लावले नसल्याचं चित्र दिसलं. देशात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना अशा प्रकारे नियमांना धाब्यावर बसवल्यामुळे कोरोनाचा फैलाव जोरदार होण्याची शक्यता आहे.

    सरकारने होळी साजरी करताना साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये, गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, मास्कचा वापर करावा असे आदेश प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे. शासनानं याकडं लक्ष द्यावं आणि नियमांचा भंग करणाऱ्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.