होळीचा रंग काढण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय घ्या जाणून

होळी खेळण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेल अथवा व्हॅसलिन लावा. हे आपल्या त्वचेला आवश्यक आद्रता आणि संरक्षण देतात. त्यामुळे होळीचा रंग शरीरावर राहू शकत नाही आणि अंघोळ करताना काही मिनिटांतच ते निघून जातील.

    होळीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर त्वचेला लागलेला रंग घालवणे अवघड होते. रंग घालवण्यासाठी अनेकदा साबणाचा अधिक वापर केला जातो. यामुळे त्वचा खरखरीत आणि कोरडी होते, तसेच शरिराच्या उघड्या भागाची आग होऊ लागते. अशा वेळी त्वचेला हानी होऊ न देता रंग काढून टाकण्यासाठी काही सोप्या उपायांची माहिती आपल्याला अवश्य उपयोगी पडेल.

    होळी खेळण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेल अथवा व्हॅसलिन लावा. हे आपल्या त्वचेला आवश्यक आद्रता आणि संरक्षण देतात. त्यामुळे होळीचा रंग शरीरावर राहू शकत नाही आणि अंघोळ करताना काही मिनिटांतच ते निघून जातील.

    त्वचेवरील होळीचा रंग घालविण्यासाठी हरभरा पीठात गुलाब पाणी, कोरफड, कच्चे दूध मिसळून एक पेस्ट तयार करा. १०-१५ मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रंग निघून जाईल.तसेच हरभरा पीठ, दही, मध आणि थोडे नारळ तेल मिसळून त्याची पेस्ट बनवा. अंघोळ करताना ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावून मालिश करा आणि नंतर कोमट पाण्याने अंघोळ करा, असे केल्याने रंग निघून जाईल व त्वचा पूर्वीसारखी होईल.

    फळांचा फेस पॅक लावल्याने होळीचा रंग निघून जातो. त्यासाठी पपई, केळी अथवा किवी मॅश करून त्याची पेस्ट बनवा, मग ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील जळजळ कमी होईल आणि त्यामुळे चेहरा थंड होईल.मुलतानी माती, गुलाब पाणी, दही आणि मध यांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास कोरडी त्वचा मुलायम होते आणि त्वचेत ओलावा टिकून राहतो.