शिमगा साजरा करताय? मग हे नियम लक्षात ठेवा, होळीवर कोरोनाचं सावट

दरवर्षीप्रमाणे यंदा होलिकोत्सव आणि शिमगा साजरा करता येणार नाही, हे आता सरकारच्या नव्या सूचनांवरून स्पष्ट झालंय. राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर शिमगोत्सव साजरा करण्यावर सरकारच्या वतीनं निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेषतः कोकणात दरवर्षी शिगम्याला देवांच्या पालख्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र यंदा या मिरवणुका न काढता मंदिरातच दर्शन घ्यावं, अशा सूचना करण्यात आल्यात.

  होळी किंवा शिमगा हा महाराष्ट्रात एका अनोख्या पद्धतीनं साजरा केला होता. उत्तर भारतापेक्षा महाराष्ट्रात होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी असते. महाराष्ट्रात हा सण शिमगा म्हणून साजरा केला जातो. कोकणात तर गणेशोत्सवाप्रमाणे होळी उत्सवाची धूम असते. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चाकरमानी कोकणातल्या आपल्या गावी जात असतात. मात्र यंदाच्या होलिकोत्सवावर कोरोनाचे सावट आहे.

  दरवर्षीप्रमाणे यंदा होलिकोत्सव आणि शिमगा साजरा करता येणार नाही, हे आता सरकारच्या नव्या सूचनांवरून स्पष्ट झालंय. राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर शिमगोत्सव साजरा करण्यावर सरकारच्या वतीनं निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेषतः कोकणात दरवर्षी शिगम्याला देवांच्या पालख्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र यंदा या मिरवणुका न काढता मंदिरातच दर्शन घ्यावं, अशा सूचना करण्यात आल्यात.

  कोकणात शिमग्याला घरातील आणि मंदिरातील देवांच्या पालख्यांच्या मिरवणुका काढण्याची परंपरा आहे. या मिरवणुकासाठी गावातील लोक एकत्र जमतात आणि मोठी गर्दी होते. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा विचार करता एवढी गर्दी परवडणारी नाही. त्यामुळे संसर्ग अधिकच फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पालख्यांच्या मिरवणुका काढणे किंवा गर्दी होईल असे कुठलेही उपक्रम करण्यावर निर्बंध लादण्यात आलेत.

  काही महत्त्वाचे नियम

  • २८ मार्च या दिवशी गर्दी न करता सण साधेपणाने साजरा करावा
  • घरोघरी पालख्या न नेता मंदिरात दर्शन घेण्याची सोय स्थानिक प्रशासनाने करावी
  • धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरे करावेत
  • मोठ्या स्वरुपाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये
  • कोविड संबंधित नियम आणि सूचनांचं पालन करावं.