natural colors

होळीच्या(holi) बाजारात उपलब्ध असलेल्या रंगांमधील रसायने(chemicals in colors) तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे रंगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक रंग बनवू शकता. हे नैसर्गिक रंग तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकता, (how to make natural colors at home)ते आपण पाहूयात.

  होळी(holi) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काहीजण होळीच्या दुसऱ्या दिवशी तर काहीजण होळीनंतरच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळतात. मात्र  बाजारातल्या रंगांमध्ये काही रसायने(chemicals in colors) वापरली जातात. ही रसायने तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे रंगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक रंग बनवू शकता. हे नैसर्गिक रंग तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकता, ते आपण पाहूयात.

  लाल रंग – गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी लाल रंग बनवू शकता. गुलाबाच्या पाकळ्या वाटून ते मिश्रण गहू किंवा तांदळाच्या पिठामध्ये मिसळा. या रंगाला सुगंधही येईल.लाल रंग बनवण्यासाठी बिटही वापरू शकता. बीट कापून घ्या. मग त्याचा रस काढा आणि पीठ किंवा मैद्यात मिसळा. सुंदरसा लाल रंग घरच्या घरी तयार होईल.

  हिरवा रंग – पालक किंवा मेथीपासून हिरवा रंग बनवणे अगदी सोपे आहे. पालक किंवा मेथी उकळून त्याची पेस्ट बनवा. पेस्ट सुकवा आणि वाटून घ्या. ही पावडर आरारूट किंवा तांदळाच्या पिठामध्ये मिसळा. चांगला वास यावा म्हणून त्यात चंदन पावडर मिसळा.

  पिवळा किंवा नारंगी रंग-पिवळा रंग म्हणून तुम्ही हळदीचा वापर करु शकता. त्यापासून कोणतेही साईड इफेक्ट होण्याची भीती नसते. तसेच पिवळा रंग बनवण्यासाठी झेंडूच्या फुलांचाही वापर होऊ शकतो.

  चॉकलेटी रंग- चॉकलेटी रंग बनवण्यासाठी ‘कात’ वापरा.  चहा किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड करुन त्याचे पाणी तुम्ही रंग खेळण्यासाठी वापरू शकता.

  काळा रंग – आवळ्याची पूड ७-८ तास लोखंडी भांड्यामध्ये भिजवा. काळा रंग तयार. काळ्या द्राक्षांपासूनही तुम्ही काळा रंग तयार करु शकता. काळ्या द्राक्षांचा रस पाण्यामध्ये मिसळून ते पाणी गाळून वापरा.