होळीतील भांगाचा ‘हँगओव्हर’ उतरवा घरच्या घरी; या टिप्स जरूर वाचा

होळीला अनेकदा आग्रहाखातर भांगाचे अधिक सेन केले जाते. परंतु भांगाच्या जास्त सेवनामुळे अनेकांना त्याचा त्रासही होते. अश्यावेळीभांगाचा हँगओव्हर लवकर उतरवण्यासाठी घरगुती पद्धतीच्या टिप्स

    देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या होळीच्या सणावर यंदा कोरोनाचे सावट आहे. मात्र तरी आपल्या कुटुंबियांसोबत घरी होळीचे नियोजन करु शकता. होळीत केली जाणारी रंगांची उधळण आणि जोडीला भांगाची गोडी ही असतेच . होळीला अनेकदा आग्रहाखातर भांगाचे अधिक सेवन केले जाते. परंतु भांगाच्या जास्त सेवनामुळे अनेकांना त्याचा त्रासही होते. अश्यावेळी भांगाचा हँगओव्हर लवकर उतरवण्यासाठी घरगुती पद्धतीच्या या टिप्स जरूर वाचा

    -लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते आणि हे हँगओव्हर बरे करण्यात मदत करेल.

    -लिंबामधील अँटीऑक्सिडेंट गुणधर्म भांगचे हँगओव्हरच्या परिणामाचा प्रतिकार करतील तर पाणी पिण्याने आपले शरीर हायड्रेटेड आणि ताजे ठेवेल.

    – लिंबू पाण्यामुळे मळमळ आणि थकवा कमी करण्यास देखील मदत करेल. त्यामुळे भांग पिल्यानंतर लिंबू पाणी पिणे आवश्यक आहे.

    -हर्बल चहा सेवनामुळे शरीरातील विषाक्त्यापासून मुक्त होण्यास मदत होते. यांच्या सेवनामुळे मेंदूतुन भांगाचा प्रभाव कमी करण्यास मदत होईल त्यामुळे ग्रीन टी किंवा हर्बल चहामुळे भांगाचा हँगओव्हर कमी होईल.

    त्यामुळे यंदाची होळी खास कुटुंबियांसोबत घरीच बनवलेल्या खास गुजिया,पकोडे, पुरणपोळी सारख्या स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारत सुरक्षितपणे साजरी करा कुटुंबातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सहभागी करून घेऊन , नैसर्गिक रंगांच्या मदतीने आरोग्यदायी होळी साजरी करा.