rashi bhavishya

18 october horoscope

मेष – बोलण्यावर संयम ठेवा. लहान-सपान कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्न बघून खर्च करा. आत्मविश्वसावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या

वृषभ – नवीन व्यवहार करणे आज शक्यतो टाळा. पैसे अडकण्याची शक्यता. दिवसाची सुरूवात मध्यम स्वरूपाची असू शकते. कुटुंबातील व्यक्ती अडचणी टाकण्याची शक्यता आहे. केलेल्या योजना गुप्त ठेवा. वाद-विविदांमध्ये अडकण्याची शक्यता.

मिथुन – आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्पन्न आणि खर्च सम प्रमाणात राहिल. ऑफिसमध्ये आधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. आपत्यांकडून चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत.

कर्क – नव्या व्यवसायाकडे वळाल. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकेल. आरोग्यामध्ये सुधार होण्याची शक्यता आहे. जूने आजार दूर होतील. काही नवीन करण्याची उमेद जागी होईल.

सिंह – काही वरिष्ठ माणसे तुमच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. आज तुम्ही बुद्धीच्या जोरावर कठीण कामे मार्गी लावाल. जास्त मेहनतीचे काम करण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आपत्यांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या – स्वत:वर विश्वास ठेऊन काम करा. व्यापार आणि नोकरीमधील कामे पूर्ण करण्यास दिवस चांगला आहे. नशिबाचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रगतीच्या चांगल्या संधी मिळताल.

तुळ – कर्जापासून मुक्त व्हाल. स्वत:च्या कामावर लक्ष राहू द्या. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन अधीक घट्ट होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र परिवाराकडून मदतीची शक्यता आहे. सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवाल.

वृश्चिक – व्यावसायात यश मिळेल. खास कामे पूर्ण होण्याची शक्यता. आरोग्य चांगले राहिल. खाजगी समस्या मार्गी लागतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि त्याच वाटचेने पुढे जा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. अभ्यासात मन रमेल. व्यापाराच्या दृष्टीने प्रवासयोग आहे. स्वत:वर संयम ठेवा.

धनु – नोकरीमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. नव्या करारांचा फायदा होईल. धनलाब होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या यश मिळेलल. आज इतरांना तुमचा फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी नम्रतेने वागा. दूरच्या ठिकाणहून एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला काही जबाबदाऱ्याही मिळू शकतात.

मकर – व्यवसाय आणि नोकरीमध्ये कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. विचार सकारात्मक ठेवा. विश्वसनिय व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. तुमच्या भावनांचा सन्मान होईल. आरोग्याकडे विशेष करा.

कुंभ – कार्यालयात कामकाजाचा व्याप वाढेल. कही लोग तुमचा स्वर्थासाठी उपयोग करतील. जास्त विचार करू नका. मनातली गोष्ट साथीदारापासून लपवू नका. आज केलेल्या कामाचे फळ नक्की मिळेल. करिअर आणि वैयक्तीक आयुष्य चांगले आहे.

मीन – बेरोजगारांसाठी दिवस शुभ असण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळण्याची हमी आहे. पैसा अणि व्यवसायीक व्यवहारांवर विशेष लक्ष द्या. सामाजिक सन्मान वाढेल.