rashibhavishya

ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शूभ आहे. या खास दिवशी काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल.

  आज वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमा या तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आज बुद्ध पौर्णिमाही(Buddha Purnima 2021) आहे. आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. यावर्षी पौर्णिमा २६ मे या दिवशी आली आहे.या दिवशी भगवान बुद्ध, भगवान विष्णू आणि चंद्राची आराधना केली जाते. हिंदू धर्मात भगवान बुद्धांना विष्णूचा अवतार मानले जाते. धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमेच्या दिवशी स्नान- दान केल्याने चांगले फळ मिळते.

  ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ आहे. या खास दिवशी काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल.

  • ज्योतिषशास्त्रानुसार,मिथुन राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा खूप शुभ आहे. आर्थिक तंगी दूर होऊ शकते.कामामध्ये यश मिळेल. देवाणघेवाण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
  • सिंह राशीच्या लोकांनाही बुद्ध पौर्णिमा शुभ आहे. या दिवशी नोकरी आणि व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक कामांमध्ये यश मिळेल.
   कन्या राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला आहे. यादिवशी आर्थिक उत्कर्ष होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. तसेच व्यवहार लाभदायक ठरतील.
  • मकर राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा आर्थिक बाजू सक्षम करणारी आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत.
  • मीन राशीच्या लोकांना बुद्ध पौर्णिमेला नशीबाची साथ मिळणार आहे. धनलाभ होईल.आर्थिक स्थिती सुधारेल.