दैनिक राशीभविष्य : ०१ सप्टेंबर २०२१ ‘या’ राशीच्या लोकांना सर्व कामांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल.; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य!

  मेष (Aries):

  बुधवारी व्यापारात वृद्धी होईल. आरोग्य साधारणपणे चांगले राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. घरात उत्साही वातावरण असेल. पैसे गुंतवल्यास लाभदायक ठरणार आहे. अज्ञात व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक :  लाल, 7

  वृषभ (Taurus):

  तुमच्यासाठी बुधवारी हा वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या उपक्रमांसाठी शुभ आणि आशादायक आहे. व्यवसायात विपणन संबंधित कामाकडे अधिक लक्ष द्या. पेमेंट जमा करण्यासाठी आता सर्वोत्तम वेळ आहे.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  मिथुन (Gemini):

  काही चांगली बातमी आपला दिवसात आनंदात भर टाकेल. परिस्थिती कठीण असू शकते. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळविण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतणार नाही. व्यापारी वर्गासाठी गोष्टी थोड्या सामान्य राहतील.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कर्क (Cancer):

  तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोलावे. महत्त्वाच्या गोष्टी जोडीदाराला नक्की सांगा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लोकांना आदर मिळेल. नोकरीत तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा देखील मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  सिंह (Leo):

  आजचा आपला दिवस चांगला आहे. तुम्ही जे काही कराल, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशी व्यापारातून नफा मिळण्याची प्रबळ शक्यता आहेत.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कन्या (Virgo):

  नव्या लोकांसोबत भेटी होतील. संबंध चांगले होतील. कार्यस्थळी काही अडचणी निर्माण होतील. मच्या निष्ठा आणि मेहनती स्वभावामुळे तुम्हाला यश मिळेल. इतरांच्या सहकार्याने केल्या गेलेल्या कार्याचेही लाभ मिळतील. नोकरी करत असलेल्या लोकांना नोकरीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होईल.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  तूळ (Libra):

  पैशांच्या बाबतीत तुम्हाला काही मदत हवी असेल तर ती आज सहज उपलब्ध होईल. तुमची व्यावहारिक दृष्टी आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता तुमच्या कारकीर्दीत तुमची प्रतिष्ठा वाढवेल. व्यवसाय सौद्यांद्वारे आपल्याला काही अनपेक्षित नफा मिळू शकतात. आपण घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृश्चिक (Scorpio):

  नोकरीमध्ये मान प्रतिष्ठा मिळेल. नव्या संधी चालून येतील. प्रमोशनबद्दल विचारणा होईल. मित्र किंवा कुटुंबासोबत बाहेर जाल. आरोग्याकडे लक्ष द्या.काही चांगली बातमी आज मिळेल. आकस्मिक लाभ होण्याची जास्त शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  धनु (Sagittarius):

  सर्व कामांमध्ये यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष फळ प्राप्त होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र आणि सहकारी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये साथ देतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मकर (Capricorn):

  नशीब तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुमचा मूड खूप चांगला असेल. तुमच्या निष्ठा आणि मेहनती स्वभावामुळे तुम्हाला यश मिळेल. गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधून आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. आकस्मिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  कुंभ (Aquarius):

  स्वास्थ उत्तम राहिल. दुसऱ्यांसोबत व्यवहार चांगले ठेवा. परेदाशात जाण्याची संधी मिळेल. गुंतवणूक कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधून आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  मीन (Pisces):

  बुधवारी विद्यार्थी चांगलं प्रदर्शन करू शकतील. कोणाला उधार देताना विचार करा. पेटाते विकार जडतील. आरोग्याकडे लक्ष द्या. अनोळख्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. कोणतेही नवीन कार्य करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नशिबाची साथ मिळेल. मित्र आणि सहकारी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये साथ देतील.
  शुभ रंग आणि अंक : नारंगी, 1