दैनिक राशीभविष्य : ०३ जुलै २०२१; ‘या’ राशीचे लोक हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी करतील, कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य!

  मेष (Aries) :

  मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल. तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. दिवस चांगला सुरू होईल. तुमच्यात नवीन उत्साह पहायला मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  वृषभ (Taurus) :

  नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या गोड बोलण्याने गोड तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. त्याचप्रमाणे तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने आपलं कार्य यशस्वी कराल. कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  मिथुन (Gemini) :

  तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. ते काम असो किंवा कौटुंबिक आनंद, आपल्यासाठी वेळ खूप शुभ आहे. तुमचं लक्ष चांगल्या कामाकडे जाईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक :भगवा, 1

  कर्क (Cancer) :

  तुम्ही दिवसभर ताजेतवाने रहाल. नोकरीत तुम्हाला यश मिळेल आणि व्यवसायातही फायदा होईल. कौटुंबिक वाद संपेल. आजच्या दिवशी तुमचं प्रत्येक कार्य अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि इतर स्पर्धेत यश मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  सिंह (Leo) :

  तुमचा दिवस फार चांगला जाणार नाही. तुम्हाला संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी, तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. त्यामुळे धैर्य गमावू नका आणि आगामी कठीण परिस्थितीला सामोरे जा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कन्या (Virgo) :

  शुक्रवार आपल्यासाठी अविस्मरणीय दिवस असेल. दिवसाची चांगली सुरूवात होणार आहे. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  तुला (Libra) :

  नशीब तुमच्या सोबत आहे. तुमच्या कामातील कामगिरी चांगली असणार आहे. आपल्याकडे जी बोलण्याची कला आहे ती तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यास उपयुक्त ठरतं.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  वृश्चिक (Scorpio) :

  तुम्हाला कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. या कल्पनांना वास्तविक आकार देऊ शकता. भाग्य तुमच्या सोबत असेल. आपण आपल्या मित्रांसह आणि परिचितांसोबत चांगला वेळ घालवाल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  धनु (Sagittarius) :

  कामाच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून मुक्तता मिळवू शकता. तुमची सर्व काम यशस्वी होतील. आरोग्य सामान्यत: चांगले राहील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मकर (Capricorn) :

  आपला दिवस स्फुर्तीने भरलेला असेल. तुम्हाला कामातील कष्टाचं फळ नक्कीच मिळेल. मन प्रसन्न राहील. दिवस चांगला सुरू होईल, नशीब तुम्हाला साथ मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  कुंभ (Aquarius) :

  आज तुम्ही उत्साहात राहाल. नशीब तुमच्या बरोबर आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीची भेट होईल यामुळे तुम्ही आनंदी व्हाल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मीन (Pisces) :

  कौटुंबिक जीवन उतार-चढ़ाव भरलेले असेल. तुमचं परिश्रम आणि समजूतदारपणा तुमच्या आयुष्याला आनंदी करण्यात मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याचे कौतुक होईल. तुमच्या दिवसची चांगल्या बातमीने सुरुवात होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9