दैनिक राशिभविष्य : ०६ सप्टेंबर २०२१ ‘या’ राशीच्या लोकांनी हुशारीने काम केलं तर अतिरिक्त पैसे कमवू शकता. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ आनंदी असतील.; जाणून घ्या, तुमचे आजचे राशिभविष्य!

  मेष (Aries) :

  तुम्ही सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाकडे विशेष लक्ष द्याल. कोणताही मोठा छंद पूर्ण करण्यात तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस घालवू शकता. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची चिन्हं आहेत. व्यवसायात तुम्हाला नफा मिळू शकतो. बेरोजगारांना अपेक्षित नोकरी मिळू शकते.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  वृषभ (Taurus) :

  सोमवार तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. खर्चात कपात होईल व प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपणास कोणत्याही प्रकारे आर्थिक चणचण भासणार नाही. आपली सर्जनात्मकता आपल्या कामास येईल. आपण एखादा नवीन छंद जोपासण्याचा सुद्धा प्रयत्न कराल.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  मिथुन (Gemini) :

  सोमवार तुमच्यासाठी शुभ असेल. नवीन लोकांना भेटल्यानंतर तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न कराल. कठोर परिश्रमांनुसार लाभ न मिळाल्याने निराशा होऊ शकते.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  कर्क (Cancer) :

  तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. तुमच्यातील ऊर्जा बाहेर आणण्याची गरज आहे. जर तुम्ही हुशारीने काम केलं तर अतिरिक्त पैसे कमवू शकता. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ आनंदी असतील.
  शुभ रंग आणि अंक :  पांढरा, 5

  सिंह (Leo) :

  सोमवार तुमच्यासाठी नवीन भेटी घेऊन येईल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असेल. लोकांच्या मदतीने तुमचं उत्पन्न वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात एकाच प्रकारचे काम करताना कंटाळा येऊ शकतो. मेहनतीच्या बळावर तुम्ही अवघड काम सहज पूर्ण कराल.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  कन्या (Virgo) :

  आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला परिणाम देणारा आहे. इतरांकडून सहकार्य मिळवणं तुम्हाला सोपं जाईल. काही कलात्मक कामात तुमचा हात आजमवाल आणि त्यातून पैसे कमवाल. महिला नवीन कपडे किंवा काही घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी खरेदीला जाऊ शकतात.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  तूळ (Libra) :

  तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन ध्येय निश्चित करण्यासाठी दिवस शुभ आहे. उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतायत. तुम्ही जुन्या कर्जापासून मुक्त व्हाल. जोडीदार तुमच्यावर प्रभावित होईल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  वृश्चिक (Scorpio) :

  सोमवार तुमच्यासाठी शांततापूर्ण असेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात बुद्धीचा वापर कराल जेणेकरून तुमचं काम बिघडण्यापासून वाचेल. पैशांच्या चिंता दूर होऊ शकतात. तुम्ही देशाबाहेर जाण्याचा विचार करू शकता.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  धनु (Sagittarius) :

  सोमवार तुमच्यासाठी शुभ ठरेल. जीवनसाथी व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. विचार केलेल्या कामांची गती मजबूत राहील. तुम्हाला करिअरशी संबंधित काही नवीन आणि मनोरंजक ऑफर मिळू शकतात. पैशांच्या बाबतीत संयम राखा.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  मकर (Capricorn) :

  सामाजिक क्षेत्रात तुमची आवड वाढण्याची चिन्हं आहेत. तुम्ही तुमची श्रेणी वाढवू शकता. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन कल्पना आणाल. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. व्यवहाराशी संबंधित कामं पूर्ण होऊ शकतात.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  कुंभ (Aquarius) :

  तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला नफा मिळवू शकता. आपण केलेल्या कोणत्याही कार्याचे त्वरित परिणाम मिळतील. आपण मुलांसाठी कोणतीही गुंतवणूक किंवा मालमत्ता घेऊ शकता. कुमारिकांचं लग्न निश्चित होऊ शकतं.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  मीन (Pisces) :

  जीवनाबद्दल तुमचा दृष्टीकोन तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. वेळेच्या अनुकूलतेची भावना असेल. व्यावसायिक कार्यात तुमच्या मनाप्रमाणे करार होण्याची शक्यता आहे. मित्राच्या मदतीने रखडलेलं काम पूर्ण होईल.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3