दैनिक राशीभविष्य १५ जून २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना आज विरोधकांपासून सावध राहावे लागेल. ; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य!

  मेष :

  कामाचं नियोजन करून त्यानुसार कामं मार्गी लावण्यात आज आपल्याला यश मिळेल. अधिकारी-वरिष्ठांसोबच चांगले संबंध प्रस्थापित होतील. मान, सन्मान आणि समृद्धी मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ :

  या राशीच्या लोकांचा आज सतर्क राहण्याची फार आवश्यकता आहे. आपलं व्यक्तीमत्त्व प्रभावशाली बनेल. आज आपली अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करू शकता. या आठवड्यात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  मिथुन :

  राजकारणात आपल्याला यश मिळेल. दुसऱ्यांच्या फायद्यासाठी आपण काम कराल. आपण दिलेला सल्ला दुसऱ्यांच्या कामी येईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कर्क :

  अशुभ घटना किंवा गोष्टींवर तुम्ही विजय मिळवू शकणार आहात. शत्रूंना आपण मात देण्यात यशस्वी व्हाल. वातावरण आनंदीत करणारे असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  सिंह :

  आपल्याला शुभ समाचार मिळेल. अडकलेली सरकारी कामं आज पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत. मात्र या प्रवासात काळजी घेणं फारच आवश्यक असणार आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  कन्या :

  आपल्या क्षेत्रात मान सन्मान मिळेल. आज आपल्याला खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. आपल्यासोबत कोणतीतरी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  तुळ :

  आजचा दिवस आपल्याला संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. वैवाहिक जीवन आज चांगलं जाईल. आरोग्याच्या समस्या जाणवतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  वृश्चिक :

  मानसिक तणाव आपल्याला असणार आहे. कामाच्या ठिकाणी आज आपल्याला सहकाऱ्यांची मदत मिळेल. अविवाहित लोकांसाठी आज विवाह जुळण्याचा योग आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  धनु :

  आजचा दिवस या राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास आहे. आपल्याला या आठवड्यात लाभ होणार आहे. हुशारीनं काम केलं तर त्याचा फायदा दुप्पट होईल. घरात आनंदाचं वातावरण राहिलं.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  मकर :

  आज आपल्या हातात पैस टिकणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. संयम आणि हुशारीनं कामं करणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही गोष्टीत अडकणार नाही याची काळजी घ्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कुंभ :

  व्यापार आणि व्यवसायात चांगला फायदा होईल. कुटुंबात सुख आणि समाधान असेल. थोडी उदासिनता असणार आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मीन :

  व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होईल. नव्या लोकांसोबत भेटीगाठी होतील. आज आपल्याला कामाच्या ठिकाणी मदत होणार आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9