rashi bhavishya

मेष – काम पूर्ण ताकदीनिशी पूर्ण कराल. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीमुळे फायदा होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. धैर्य ठेवा. आर्थिक प्रश्न सुटतील. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राहील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल.

वृषभ – आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. सावध राहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि कमी झोपेमुळे समस्या होऊ शकते. व्यवसायात वाढ करु नका. जसं सुरु आहे तसंच चालू ठेवा. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते.

मिथुन – कुटुंबातील लोकांमुळे समस्या होऊ शकते. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कोणाशीही शेअर करु नका. वाद होऊ शकतात. डोकेदुखी, पोटदुखी होऊ शकते.  व्यवसायात नवीन काम काढू नका. पैसे अडकू शकतात. दिवसाची सुरुवात चांगली नाही. इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागू शकतात.

कर्क – कामात अडचणी आल्याने मूड खराब होण्याची शक्यता आहे. धावपळ होईल. काही गोष्टींमध्ये लोकांची मदत मिळणार नाही. तब्येतीत चढ-उतार राहील. झोप कमी राहील. डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते. नोकरीत समस्या होऊ शकते. दररोजच्या कामात जोखीम असू शकते. हट्टीपणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. विचार करण्यात अधिक वेळ घालवू नका. अचानक समस्या वाढू शकते.

सिंह – ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुप्तपणे तुमची मदत करु शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ मिळेल. जोडीदाराकडून आर्थिक मदत होईल. कुटुंबात सुख-शांती राहील. सामाजिक कामात सन्मान मिळेल. चांगल्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

कन्या – समस्या संपतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. दिवसभर थकवा जाणवेल. आराम करा अन्यथा त्रास होऊ शकतो. व्यवसाय वाढेल. कर्मचाऱ्यांची मदत मिळेल. खास व्यक्तींशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी उसंत मिळेल.

तुळ – नोकरी, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. विशेष लाभासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. नशिबाच्या साथीने अनेक कामं पूर्ण होतील. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. जोडीदारावर खर्च होऊ शकतो. तुमच्या भावना इतरांवर थोपवू नका.

वृश्चिक – व्यवसायात कमी फायदा होईल. बदलीची शक्यता आहे. दिवस काही प्रमाणात कठीण असेल. कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणामुळे कामात मन लागणार नाही. वायफळ गोष्टींमध्ये वेळ खर्च होईल. अविवाहित लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव राहील. जोडीदाराचा मूड चांगला नसेल. विचार केलेली कामं पूर्ण न झाल्याने मूड खराब होऊ शकतो.

धनु – दररोजची कामं पूर्ण होण्याचा योग आहे. कामं पूर्ण होतील. विचार करुन निर्णय घेतल्याने फायदा होईल. पैशांच्या स्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंब, समाजात तुमचं महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांत यश मिळेल. जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होऊ शकतात. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. तब्येतीत चढ-उतार होईल. जेवणात मसालेदार पदार्थांचा वापर करु नका.

मकर – घाईत कोणतंही काम करु नका. पैशांबाबत चिंता राहील. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात एखाद्या गोष्टीवरुन समस्या वाढू शकतात. ऑफिसमध्ये तणावापूर्ण स्थिती राहू शकते. आज मित्र किंवा कुटुंबाच्या गरजांमध्ये अडकू शकता. पोटासंबंधी तक्रार होऊ शकते.

कुंभ – कामात व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. मेहनतीने अधिक पैसे मिळवाल. अनेक दिवसांपासून राहिलेली कामं पूर्ण कराल. दिवस चांगला आहे. अनेक क्षेत्रांत सक्रिय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात. अविवाहितांना जोडीदारासोबत वेळ मिळेल. प्रवास होऊ शकतो.

मीन – दिवस उत्साही आणि मनोरंजनात्मक असेल. कौटुंबिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. समस्या सुटू शकतात. वैवाहिक लोकांचा दिवस सुखात जाईल. प्रेम वाढेल. जुन्या आजारांमध्ये आराम मिळू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. तुमची इमेज सुधारण्याची संधी मिळणार आहे. विचार केलेली कामं पूर्ण करा.