राशी भविष्य दि. १६ मार्च २०२१; या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील

  मेष- सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील. ऑफिसमध्ये कामं जास्त असल्यामुळे तुम्हाला त्रास होईल.

  वृषभ- चांगली बातमी कानावर येईल. ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना नफा होण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन उत्तम असेल. फार काळापासून अडकलेली कामे पूर्ण करा. दिवस सामान्य आहे. रागावर नियंत्रण ठेवा.

  मिथुन- अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत भेटी होतील. त्यामुळे काही दिवसांत चांगली बातमी कानावर येईल. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.

  कर्क- अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रेमसंबंध चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

  सिंह- मित्रांसोबत वाद होतील. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील. हा दिवस आनंद आणि चैतन्यसह एक विशेष संदेश देईल.

  कन्या- दिवस चांगला आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुम्ही मांडलेलं मत योग्य आहे, हे इतरांना पटवून देण्यासाठी जीवनसाथीकडून मदत मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.

  तुळ- कुटुंबात सुख-शांती नांदेल. चांगल्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. सामाजिक स्तरावर तुमचा सन्मान केला जाईल. साथीदाराकडून आर्थिक पाठबळ मिळेल. आज गुंतवणूक करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.

  वृश्चिक- कामात चित्त लागणार नाही. कारण आज तुमची प्रकृती काही प्रमाणात चांगली नसेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. काही मित्र तुमच्या घरी येतील. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत अधिक वेळ व्यतीत करता येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. अविवाहितांना प्रेमंसंबंधांमध्ये येण्याची संधी मिळेल.

  धनु- अधिक विचार केल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. या राशीच्या लोकांना अचनाक धन लाभ होण्याची शक्याता आहे. बाहेर फिरायला जायच्या योजना आखाल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. प्रेमसंबंध यशस्वी टप्प्यावर पोहोचतील.

  मकर- भावंडांकडून उधार पैसे मागण्याची वेळ येईल. घरातल्या कामांमुळे थकवा जाणवेल. त्यामुळे मानसिक तणाव देखील येईल. मात्र जास्त विचार करू नका. नवी जबाबदारी मिळेल. आर्थिक चणचण संपुष्टात येईल.

  कुंभ- दैनंदिन कामं पूर्णत्वास न्याल. आरोग्याची काळजी घ्या. साथीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल. कोणत्याही कामासाठी घरच्यांची मदत घ्या. प्रेम संबंधात कोणतीही अडचण नको असेल तर इतरांच्या बोलण्यावर लक्ष देवू नका.

  मीन- तुमचा स्वभाव अतिशय लाजाळू आहे जो तुम्हाला घातक ठरेल. आजचा दिवस खूप व्यस्त असला तरीही नवीन लोकांच्या भेटी होतील. जीवनसथी सोबत वाद होतील. पण ठरावीक काळानंतर सर्व ठिक होईल.