दैनंदिन राशी भविष्य १६ सप्टेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांचे अडकलेले पैसे मिळणार परत

कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळतील. धन चांगल्या गोष्टींवर खर्च करा. वायफळ गोष्टींवर खर्च करणं टाळा. प्रेम आणि व्यवसायही फारसा चांगला नाही.

  मेष (Aries) :

  व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत तुम्ही स्वतःला वेळ द्या. जीवनसाथीसोबत भेट होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभ देणारा असेल. वैवाहिक जीवन चांगलं राहिल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  वृषभ (Taurus) :

  आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत भेटी होतील. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील. हा दिवस आनंद आणि चैतन्यसह एक विशेष संदेश देईल. रागावर नियंत्रण मिळवा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  मिथुन (Gemini) :

  आरोग्याकडे लक्ष द्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत भेटी होतील. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  कर्क (Cancer) :

  स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. दिवस चांगला आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगली बातमी कानावर येईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  सिंह (Leo) :

  नशिब आज पुर्णपणे साथ देणार नाही. न्यायालयीन कामे असतील तर दिलासा मिळेल. इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. नव्या ओळखी होतील. येत्या काळत या ओळखी योग्य ठरू शकतात.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  कन्या (Virgo) :

  आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. नव्या संधी मिळतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  तुळ (Libra) :

  आज तुमच्या मनाच्या गोष्टी तुमच्या मनात ठेवा. मालमत्तेशी संबंधित मोठी आणि विशेष प्रकरणे आपल्या समोर येऊ शकतात. तरुण त्यांच्या कारकीर्दीसाठी एक नवीन योजना बनवू शकतात. नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  वृश्चिक (Scorpio) :

  अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कार्यक्षेत्रात थोडी चूक झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. प्रेमसंबंध चांगले झाले तर तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक :  गुलाबी, 4

  धनु (Sagittarius) :

  आज आपल्या रखडलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. भांडवली गुंतवणूक ही लाभार्थी योजनेत असेल. देय व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपण नोकरी बदलण्याचा किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा विचार करू शकता. मुले त्यांचे कार्य वेळेवर करण्याचा प्रयत्न करतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मकर (Capricorn) :

  आज मिळालेले पैशांची बचत केली पाहिजे. नोकरीत स्थिरता येईल. वृद्धांच्या मताकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याही कार्यात घाई करु नका आणि एकाकीपणा टाळा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कुंभ (Aquarius) :

  नकारात्मक ऊर्जा संक्रमित केली जात आहे. मानसिक त्रास होईल. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या. आरोग्य चांगले आहे, प्रेम चांगले आहे आणि व्यवसाय चांगला आहे. आई काली मातेची आराधना करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  मीन (Pisces) :

  कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळतील. धन चांगल्या गोष्टींवर खर्च करा. वायफळ गोष्टींवर खर्च करणं टाळा. प्रेम आणि व्यवसायही फारसा चांगला नाही. भावनांवर नियंत्रण ठेवा. हनुमान जीच्या आश्रयामध्ये रहा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4