दैनिक राशीभविष्य : १७ जून २०२१; ‘या’ राशींच्या लोकांना संयम बाळगणे अतिशय महत्वाचे आहे. नातेवाईकांकडून मदत मिळेल. ; जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे राशिभविष्य!

  मेष :

  करमणुकीसोबत खेळाचा समावेश केला तर दिवस उत्तम जाईल. आज पैसे खूप खर्च होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या. आज आपल्या प्रेमाला एक सुंदर वळण मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  वृषभ :

  सकाळपासूनच तुम्ही प्रसन्न अशाल. कामाकडे पूर्ण लक्ष्य द्या. सॉफ्टवेअरशी संबंधित असलेल्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. आर्थिस स्थिती बदलेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मिथुन :

  वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला चांगला अनुभव देईल. व्यापाराची परिस्थिती ठिक ठाक असेल. वर्तमान परिस्थितीत संयम अतिशय महत्वाचा आहे. नातेवाईकांकडून मदत मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  कर्क :

  निर्णय घेताना सगळ्यांच्या मतांचा विचार करा. नोकरीमध्ये स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा. कामात प्रगती होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  सिंह :

  आपला आजार बरा होऊ शकतो. पैसे आणि आपल्याकडे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आज खूप जपून ठेवा. आज आपल्या राशीचे ग्रह चांगले नाहीत त्याचा परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. नियोजन करून कार्य करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कन्या :

  आत्मविश्वास वाढेल. ग्रॉसरीशी संबंधित व्यवसायात असाल तर तुमचा फायदा होईल. ऑफिसमधील वातावरण तुमच्या बाजूने असेल. नवविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  तुळ :

  सकारात्मक विचार करा. ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका. आज खूप कसरत करावी लागू शकते.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  वृश्चिक :

  विश्रांती घेण्यासाठी आज वेळ मिळेल. आपल्या दृढ आत्मविश्वासामुळे काम सोपं होईल. आजची संध्याकाळ मित्र-मैत्रिणींसोबत जाईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  धनु :

  आज तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. आज आपल्याला ताण येऊ शकतो. कर्जाची परतफेड आजच करा. वाद आणि टीकेचा सामना करावा लागेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मकर :

  चांगल्या गोष्टी स्वीकारण्याकडे आज आपला कल असेल. जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. आज खर्चावर नियंत्रण न राहिल्यानं बजेट कोलमडेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  कुंभ :

  आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आज आपल्याला ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आज आपलं मन लागणार नाही.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मीन :

  मानसिक ताण आणि कटकटीपासून दूर राहा. आज आर्थिक चणचण जाणवू शकते. मित्रांकडून योग्य सल्ला मिळेल. नव्यानं प्रेमात पडण्याची सवय धोक्याची ठरू शकते.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9